

जातीच्या दाखल्यान बरोबरच वंचित घटकाने इतर शासकीय योजनांचा लाभ घ्यावा – डॉ.भगवान मुरूमकर
जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना केले ५०० जातीच्या दाखल्यांचे वाटप
जामखेड प्रतिनिधी
वंचित आणि भटके विमुक्त समाज्याला शासकीय कार्यालयात जातीचे दाखले मिळवण्यासाठी खुप खेटे मारावे लागतात या संस्थेने पाचशे दाखले वाटप करुन समाज्यात आदर्श निर्माण केला आहे. मात्र या समाज्याने दाखल्यान बरोबरच इतर सर्वच शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर यांनी व्यक्त केले .

शासकीय कार्यालयात येऊन जातीचा दाखला मिळवण्यासाठी किचकट प्रक्रिया पूर्ण होत नाही हीच अडचण ओळखून लक्ष्मी पवार यांच्या जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील पाचशे विद्यार्थ्यांना दि २६ जुन २०२३ रोजी दुपारी जातीचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी जामखेड शहरातुन भव्य रँली काढण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान गटविकासाधीकारी प्रकाश पोळ , साहित्यिक नामदेव भोसले, मुख्याधिकारी अजय साळवे ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले , नगरसेवक अमित चिंतामणी ,बापुसाहेब गायकवाड , अशोक पवार ,सावता भोसले , संचालक नंदु गोरे ,विनायक राऊत , सेंच्युरी कॉम्प्युटर चे संचालक विजय काळदाते , प्रा विकी घायतडक, राजेंद्र काळे नगर ,जयेश कांबळे , ॲड मोहन कारंडे ,साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे सर , सामाजिक कार्यकर्त्या सौ मीराताई तंटक, संचालक संतोष पिंपळे, वंचित बहुजन आघाडीचे आतिश पारवे, जामखेड ओम शांती सेंटर च्या भारती दिदी, जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई पवार, रुक्साना पठाण , जयश्री पवार ,नीशा पवार , दुर्गा पवार, बाबासाहेब फुलमाळी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे मार्गदर्शन करताना डॉ भगवान मुरुमकर म्हणाले की जातीचे दाखले काढताना वंचित समाज्याला मोठी कसरत करावी लागते , मात्र या संस्थेने पाचशे दाखले काढले व याला प्रशासनाने देखील मदत केली .चांगले अधिकारी आसले की कामे होत रहातात. अधिकारी वर्गाने देखील अशा लोकांना शासकीय कार्यालयात सहकार्य करावे जातीच्या दाखल्या बरोबरच आनेक योजना आहेत त्याचा देखील लाभ घ्यावा असे आवाहन मुरुमकर यांनी केले.

या नंतर साहीत्यीक नामदेव भोसले यांनी सांगितले की आजपर्यंत हा गोरगरीब समाज कायम शासकीय योजनांपासून वंचित राहीला आहे. कायम संशयाच्या नजरेने पारधी समाज्याकडे पाहीले जाते हा दृष्टिकोन आता प्रत्येकाने बदलला पाहिजे. तसेच गरीबांचे दुःख समजुन त्यांना प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.

गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पारधी समाज्याकडे आजही गुन्हेगार म्हणून पहाण्याचा दृष्टीकोन आहे तो बदलला पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांनी भटके विमुक्त व वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. पारधी व आदिवासी समाज्याने आपल्या मुलांना शिकवा व मोठे अधिकारी बनवा त्या शिवाय आपल्यावर लागलेला शिक्का पुसणार नाही. पंचायत समितीच्या वतीने वंचित समाज्याला जी मदत लागेल ती केली जाईल असे सांगितले . यानंतर नगरसेवक अमित चिंतामणी, मुख्याधिकारी अजय साळवे, सभापती शरद कार्ले, राजेंद्र काळे, भारती दिदी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष गर्जे यांनी केले तर आभार साकेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे यांनी मानले. शेवटी भारताचे संविधान वाचुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .





