सौ. मिराताई तंटक यांच्या निवासस्थानी घेतली आ. प्रा राम शिंदे यांनी सदिच्छा भेट
जामखेड प्रतिनिधी
जनतेतील आमदार म्हणून ओळख आसलेले आ. प्रा राम शिंदे यांनी नुकतेच शहरात फीरुन सर्व सामान्यांन लोकांच्या आडचणी आजुन घेत असतानाच जामखेड येथिल सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सौ. मिराताई तंटक यांची देखील सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे महीला वर्गाचा संपर्क आसलेल्या सौ. मिराताई तंटक या भाजपमध्ये प्रवेश करणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मोदी सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाली आसल्याने जामखेड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुशंगाने आ. प्रा. राम शिंदे यांनी स्वतःहा जामखेड शहरात फीरुन नागरिकांच्या घरी भेट देऊन आडीआडचणी जाणुन घेतल्या. तसेच भाजप शहराध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांचे वडील कै. महादेव ड़ोंगरे यांचे दुःखद निधन झाल्यामुळे
आ. प्रा राम शिंदे यांनी त्यांच्या कोर्ट गल्ली येथिल निवासस्थानी सांत्वन करत भेट घेतली.
यानंतर जवळच असलेल्या सामाजिक क्षेत्रात काम करत आसलेल्या सौ. मिराताई तंटक यांच्या निवासस्थानी देखील आ. प्रा राम शिंदे यांनी सदिच्छा भेट दिली. या पुर्वी देखील मिराताई तंटक यांनी शिवसेना पक्षात महीला संघटनेच्या माध्यमातून महीलांच्या आडीआडचणी सोडवण्यासाठी काम केले आहे. तसेच त्यांचा महीला वर्गामध्ये मोठा जनसंपर्क आहे. आता नुकतीच आ. प्रा राम शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्या भाजप मध्ये प्रवेश करणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या वेळी माजी सभापती रवी सुरवसे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, भाजपा अल्पसंख्याकचे अध्यक्ष सलिम बागवान, भाजपा तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद, सभापती शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, बिबीशन धनवडे, तात्याराम पोकळे, संजय राऊत सर, मोहन (मामा) गडदे, भाजपा डॉ अल्ताफ शेख, प्रविण चोरडिया, महेश मासाळ, रुऋकेष मोरे, बाबासाहेब फुलमाळी, राम पवार, तुषार बोथरा उपस्थित होते.