रोखठोक जामखेड…..
तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठींची सुरू झालेली मतदान प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली. काल दिवसभरात ३९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत तालुक्यात एकुण ८२.४८ टक्के मतदान झाले. तालुक्यातील एकुण ५५५६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवार दि. १८ रोजी जामखेड येथील तहसील कार्यालयात होणाऱ्या मतमोजणी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जामखेड तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींसाठी १२८ मतदान केंद्र आहेत या मध्ये एकुण ६७३६८ मतदार आहेत यात पुरुषांची संख्या ३६१४७ तर स्त्रीयांची संख्या ३१२२१ असे मतदार आहेत यापैकी ३००२९ पुरुषांनी तर २५५३५ स्त्रीयांनी अशा एकुण ५५५६४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अशा प्रकारे तालुक्यात एकुण ८२.४८ टक्के विक्रमी मतदान झाले आहे.
दिवसभर काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे सतर्क होते. कोणीताही गैर प्रकार केल्यास त्याची गय केली जाणार नाही असा पुर्वीच प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला होता. त्यामुळे किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
तालुक्यातील साकत येथे ९० वर्षांच्या व्यक्तींचे तीन चाकी सायकलवर येत मतदानाचा हक्क बजावला. महिला वयोवृद्ध व्यक्ती व अपंग मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला अनेक मतदार केंद्रावर गर्दी दिसत होती. तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रांवर गर्दी होती. त्यामुळे आकडेवारी मिळण्यास उशीर झाला होता. तालुक्यातील खर्डा येथे सर्वात कमी ७४.४ टक्के मतदान झाले. तर नान्नज ७४. ५७ टक्के, साकत ८१. २० टक्के, अरणगाव ७८.२६ टक्के, जातेगाव ७९.६३ टक्के, दिघोळ ८४. ५२ टक्के, पिंपरखेड ८८.४४ टक्के, नायगाव ८०.७१ टक्के तेलंगशी ८७.८६ टक्के चौंडी ९१.३० टक्के असे एकुण तालुक्यात एकूण ८२.४८ टक्के तर सर्वात जास्त बोर्ले ९२.८० टक्के मतदान झाले आहे. आता सोमवार दि १८ जानेवारी रोजी जामखेड येथील तहसील कार्यालयात होणार्या मतमोजणी कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






