राजकीय वर्चस्ववादातून आवारेंची हत्या; आईचा आरोप, आमदार सुनील शेळकेंसह भावावर गुन्हा दाखल

पुणे : राजकीय वर्चस्वाला धक्का निर्माण होईल या भीतीने जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या हत्येप्रकरणी आमदार सुनील आण्णा शेळके त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह आरोपी शाम निगडकर आणि इतर तीन अनोळखी व्यक्तींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

या घटनेमध्ये किशोर शेळके यांच्या मातोश्री सुलोचना गंगाराम आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांत तक्रार दिली असून या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय वादातून ही हत्या केल्याचा आरोप किशोर आवारे यांच्या आईने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना आवारे आणि किशोर आवारे हे गेल्या १० वर्षांपासून एकमेकांसोबत राहतात. किशोर आवारे हे जनसेवा विकास सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून तळेगाव दाभाडे येथे सामाजिक काम करत होते. तसेच जनसेवा विकास सेवा आघाडी या पॅनेलमधून तळेगाव येथे राजकारणात देखील सक्रिय होते. त्यामुळे त्यांचे राजकीय विरोधक असलेले सुनिल शेळके, सुधाकर शेळके संदीप गराडे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये नेहमीच वाद व्हायचे.

“गेल्या सहा महिन्यांपासून माझा मुलगा किशोर हा नेहमी मला आमदार सुनिल शेळके त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि संदीप गराडे यांच्यापासून त्याच्या जिवाला धोका असल्याचं सांगत होता”, असं सुलोचना आवारे यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. तसेच “१५ सप्टेंबर २०२२ रोजी सुलोचना आवारे यांच्या गाडीचा चालक प्रविण ओव्हाळ याला सुधाकर शेळके आणि त्यांच्या साथीदारानी शिवीगाळ केली होती. तसेच किशोर हे त्यांचा मित्र संतोष शेळके याच्यासोबत फिरत असे ही गोष्ट सुनिल शेळके आणि सुधाकर शेळके यांना अवडत नव्हती. कारण सुनिल शेळके यांचे संतोष शेळके सोबत राजकीय वितुष्ट होते. तर किशोर हा संतोष शेळके यास नेहमी मदत करत असे म्हणून सुनिल शेळके आणि सुधाकर शेळके हे किशोर आवारेंवर नेहमी चिडून असे”, असंही फिर्यादीत म्हटलं आहे.

“संतोष शेळके यांनी त्यांच्या विरोधात एन.सी दाखल केली होती. तरी किशोर यांनी स्वतःचा असा वेगळा गट तयार करून सुनिल शेळके यांना गेल्या २ वर्षांपासून पुर्णपणे राजकीय विरोध केलेला होता. तसेच किशोर यांनी सुनिल शेळके आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी केलेल्या चुकीच्या कामाच्या विरोधात वेळोवेळी निदर्शने केली होती. तसेच सोशल मिडियावरही ही बाब टाकली होती. त्याचा राग शेळके यांच्या मनात होता. तरी किशोर आवारे यांचे राजकीय वर्चस्व निर्माण होऊन सुनिल शेळके आणि सुधाकर शेळके यांच्या राजकीय वर्चस्वाला धोका निर्माण झाला होता. तसेच माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर ते याच लोकांपासून होईल”, असे देखील किशोर आवारे यांनी त्यांच्या आईला सांगितले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

त्यामुळे नगरपरिषद तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी दुपारी १२.३०वाजता श्याम निगडकर रा. तळेगाव दाभाडे व त्यांचे अनोळखी ३ आरोपी साथीदार इसमांनी बंदुकीच्या गोळया झाडुन व कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने गंभीर वार करून जखमी केले व ठार मारले आहे.असल्याची बातमी फिर्यादी यांना किशोर याचा मित्र सागर संभाजी दाभाडे यांनी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here