पाचाट” कादंबरीचा होणार रविवारी जामखेडला प्रकाशन सोहळा

जामखेड प्रतिनिधी.

योगीराज प्रकाशन, आळंदी देवाची प्रकाशित आणि नवोदित कादंबरीकार परशुराम नागरगोजे लिखित “पाचाट” कादंबरीचा प्रकाशन सोहळा थोर समाजसेवक श्री दत्ताभाऊ बारगजे, संस्थापक अध्यक्ष ,इन्फंट इंडिया, आनंदग्राम ,पाली (बीड )ह्यांच्या शुभहस्ते श्रीराम मंगल कार्यालय, मु.पो.ता.जामखेड (जि.अहमदनगर ) येथे रविवार दि. 14 मे ,2023. रोजी सकाळी 10 वा.संपन्न होणार आहे.

ऊसतोड कामगारांच्या समस्या, जगण्याचा जीवघेणा संघर्ष ,वारंवार स्थलांतर आणि विस्थापन ,तरीही जगण्याचा दुर्दम्य अशावाद आणि दारिद्र्याचे दशावतार अशा विदारक प्रश्नांवर एका ऊसतोड कामगाराची अत्यंत करुणामय कहाणी वाचताना अंत:करण पिळवटून जाते; सोसलेपणाची कणव वाचकांना कादंबरीत गुंतवून टाकते .प्रतिभावंत साहित्यिक आणि आदरणीय श्री पोपटराव काळे शिक्षणाधिकारी, मनपा, पुणे यांनी कादंबरीची केलेली पाठराखण आणि साक्षेपी आणि अभ्यासपूर्ण समीक्षा करणाऱ्या डाॅ. लता पाडेकर यांची प्रस्तावना या कादंबरीचे साहित्य जगतातील स्थान अधोरेखित करते. योगीराज प्रकाशन आळंदी देवाची ह्या प्रकाशन संस्थेने भरपूर आर्थिक सवलतीमध्ये ही कादंबरी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे .

आपण मोठ्या संख्येने प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे आणि ही महत्त्वपूर्ण मराठी साहित्यकृती प्रकाशनपूर्व सवलतीच्या दरात प्राप्त करावी आणि आस्वाद घ्यावा ; आशी माहिती नवोदित कादंबरीकार परशुराम नागरगोजे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here