रोखठोक न्यूज जामखेड …..
नान्नज गावातील ग्राम दैवत नंदादेवी मंदिराच्या विकासासाठी आलेल्या नीधीतुन निकृष्ट रस्ते केले व वरचेवर मंदिराचे पैसे खाल्ले हे पाप करणार्यांना फेडावे लागेल. आम्ही सत्तेवर आल्यास बस स्थानक परिसरात चांगले व्यापारी संकुल उभे करून ते सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायसाठी उपलब्ध करून देऊ. असे शहाजीराजे भोसले यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी नान्नज गावाला मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवले व विकास कागदोपत्री दाखवत नीधी हडप केला. त्यामुळे नागरिक नान्नज परिवर्तन पॅनलच्या बरोबर आहेत. असे माजी सरपंच संतोष पवार यांनी सांगितले. नान्नज येथील ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या करण्यात आलेल्या परीवर्तन पॅनलचा ग्रामदैवत नंदादेवी मंदिर, मालिका आर्जुन मंदिर, कालिका मंदीर, मलिकसाहेब दर्गा, विठ्ठल मंदिर व संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यानंतर झालेल्या सभेत पॅनल प्रमुख शहाजी राजे भोसले व माजी सरपंच संतोष पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की जकारणात दमबाजी चालत नाही. आम्ही परीवर्तन पॅनल मध्ये स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार उभे केले आहेत. मंदिराचा विकास कामांचा नीधी गावत वापरून निकृष्ट दर्जाची कामे केली आहेत व मंदिराचे पैसै खाल्ले याचे पाप विरोधकांना फेडावे लागेल असा टोला देखील विरोधकांना लावला. सत्तेत असताना पाच वर्षे गावात विकासाच्या मुद्यावर आपण ही निवडणूक लढविणार आहेत. ग्रामपंचायतेची विकास कामे करताना कधी टक्केवारी मागीतली नाही. विरोधक दमबाजी करतात त्यांनी गावात दहशत पसरवली आहे. मात्र त्यांना घाबरून न जाता नान्नज परीवर्तनाच्या सर्व पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून द्या असे मत व्यक्त केले. सत्ता आल्यावर गावातील बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभे करून आहे बसस्टॉंड चा प्रश्न, गावात एक नंबरचे व्यापारी संकुल व राष्ट्रीयकृत बँक अणावयाची आहे. ज्यांनी विधानसभेत आमदार रोहित पवार यांना विरोध केला त्यांनी मतासाठी आता ग्रामपंचायत निवडणुकीत आमदारांच्या फोटोचा वापर केला असा आरोपही शहाजीराजे भोसले यांनी केला.
काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जेष्ठ नेते दगडु अण्णा पवार पाटील, नागनाथ कोळपकर, काँग्रेसचे तालूकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, माजी सरपंच संतोष पवार , भाजपाचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अमजद पठाण, भरत मोहोळकर, अहमद पठाण, मच्छिंद्र माने, रामसिंग परदेशी, इन्नुस पठाण, उमर आतार, नागनाथ कोळपकर, सागर पवार, शहाजी गोरे, विष्णु मोहोळकर, दत्तु मोहोळकर, महाविरसिंग परदेशी, अर्जुन चव्हाण, शंकर पिटेकर, सुनिता साळवे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.