आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राशीनमध्ये महीला बचतगटांना मिळाला आर्थिक आधार

समई वात आणि अगरबत्ती बनवण्याच्या 65 लाख रुपयांच्या मशीनचे वाटप.

कर्जत /जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघातील महिलांना स्वयंपूर्ण आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी आमदार रोहित पवार यांची कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्था कायमच विविध उपक्रम राबवत असते.

अशातच आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था, युनियन बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने स्वप्नपूर्ती अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये 10 महिला बचत गटांना समई वात बनवण्याच्या आणि 15 महिला बचत गटांना अगरबत्ती बनवण्याच्या 65 लाख रुपयांच्या मशीनचे वाटप करण्यात आले आहे. यासोबतच 30 महिला बचत गटांना 36 लाख रुपये खेळतं भांडवल म्हणून कर्जाचे चेक एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सौ. सुनंदा ताई पवार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बँकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. यापूर्वी देखील कोट्यवधींचा निधी महिलांना सक्षम बनविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता, त्याचा देखील फायदा महिलांना स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी झाला आहे.

यामुळे बचत गटांतील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यास निश्चितच मदत होईल तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी देण्यात आलेल्या मशीनमुळे आर्थिक दृष्ट्या स्थिर होण्यासाठी देखील मोलाची मदत होणार आहे. अशा पद्धतीने विविध उपक्रम राबवून महिलांना सक्षम बनविण्यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्न करत आहेत याशिवाय आणखी कोणत्या नवनवीन संकल्पना मतदारसंघात राबवता येऊ शकतात याबाबतही ते वेळोवेळी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असतात ते राबवण्यासाठी झटत असतात. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य गणेश शिंदे यांनी महिलांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं आणि विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here