राजुरी, रत्नापूरवर राष्ट्रवादीचा झेंडा तर शिऊर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या लागलेल्या निकालात रत्नापूर व राजुरी या गावात राष्ट्रवादीच्या ताब्यात तर शिऊर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे. निवडणूकीचा निकाल लागताच विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळन करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

जामखेड तालुक्यात या टप्प्यात फक्त तीनच ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार व भाजपाचे आ. प्रा. राम शिंदे यांच्या यांचे मार्गदर्शन व नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या गेल्या. दिनांक १८ डिसेंबर रोजी यासाठीचे मतदान पार पडले होते. तेंव्हापासूनच दोन्हीकडील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून दावे प्रतिदावे करत या ग्रामपंचायती आपल्याच ताब्यात कशा येतील याचे गणित मांडले जात होते. त्यानुसार आज दि. २० डिसेंबर रोजी याबाबतचे चित्र स्पष्ट झाले. त्यानुसार तालुक्यातील तिन्ही ग्रामपंचायतचे निकाल जाहीर होऊन रत्नापुर व राजुरी राष्ट्रवादी तर शिऊर भाजपाकडे आली आहे.

१) रत्नापूर ग्रामपंचायत – विजयी उमेदवार

सरपंचपदासाठी राणी लक्ष्मण जाधव अनुसूचित जाती स्त्री, (विजयी)

प्रभाग क्रमांक १ मधुन साळवे रामदास नवनाथ – अनुसूचित जाती, शेख निजाम कालेखा – सर्वसाधारण, महारनवर आशाबाई गोरक्ष – सर्वसाधारण स्त्री.

प्रभाग क्रमांक २ मधुन शैलेश विजय कदम सर्वसाधारण, शोभा चंद्रकांत वारे – सर्वसाधारण स्त्री, सिमा शैलेश कदम – सर्वसाधारण स्त्री

प्रभाग क्रमांक ३ मधुन मधुकर सुधाकर वराडे – सर्वसाधारण, ज्योती अशोक मोरे – ना. मा. प्र. स्त्री, मनिषा दिलीप वारे सर्वसाधारण स्त्री.

२) शिऊर ग्रामपंचायत

सरपंचपदासाठी गिरीजा गौतम उतेकर सर्वसाधारण स्त्री, (विजयी)

प्रभाग क्रमांक १ मधुन नरेंद्र आण्णा पाचारे अनुसूचित जाती, आजीनाथ बंन्सी निकम -सर्वसाधारण, प्रियांका भाऊसाहेब तनपुरे सर्वसाधारण स्त्री,

प्रभाग क्रमांक २ सेवक शहाजी फाळके – ना. मा. प्रा. व्यक्ती, शोभा बापूराव पिंपरे – सर्वसाधारण स्त्री, शितल अशोक इंगळे – सर्वसाधारण स्त्री,

प्रभाग क्रमांक ३ बदाम बाबासाहेब निंबाळकर – सर्वसाधारण, उषा नारायण निकम सर्वसाधारण स्त्री,राजश्री दादा लटके सर्वसाधारण स्त्री

३) राजूरी ग्रामपंचायत.

सरपंचपदासाठी अश्विनी सागर कोल्हे सर्वसाधारण स्त्री, (विजयी)

प्रभाग क्रमांक १ विशाल अशोक चव्हाण ना. मा. प्रा. सुनिता मुकिंदा कोल्हे सर्वसाधारण स्त्री, संगीता बाळू मोरे सर्वसाधारण स्त्री,

प्रभाग क्रमांक २ बाबासाहेब रामदास घुले सर्वसाधारण, किर्ती नानासाहेब खाडे ना. मा. प्रा. स्त्री, मिनाक्षी संजय खाडे सर्वसाधारण स्त्री,

प्रभाग क्रमांक ३ गायकवाड सुरज सुनिल – अनुसूचित जाती, गौतम आश्राजी फुंदे सर्वसाधारण, संगीता शिवदास कोल्हे सर्वसाधारण स्त्री

रत्नापूर ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे तर शिऊर हे गाव भाजपाचे जेष्ठ नेते बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर यांचे आहे. निवडणूकीचा निकाल लागताच विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळन करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here