राजुरी सरपंच पदासाठी सौ अश्विनीताई सागर कोल्हे यांचा शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

जामखेड प्रतिनिधी

राजुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उच्चशिक्षित आसलेल्या सौ अश्विनीताई सागर कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज तहसीलदार कार्यालयात भरण्यात आला. यावेळी विषेश म्हणजे महीलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत होती.

जामखेड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे या मध्ये राजुरी (कोल्ह्याची) या गावाचा देखील समावेश आहे. या अनुषंगाने काल दि १ डिसेंबर रोजी राजुरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उच्चशिक्षित आसलेल्या सौ अश्विनीताई सागर कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज तहसीलदार कार्यालयात भरण्यात आला. यावेळी त्यांना विद्यमान सरपंच गणेश कोल्हे, विद्यमान उपसरपंच मा बाबासाहेब घुले, यांच्यासह सात विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी सौ. अश्विनीताई सागर कोल्हे (MA. bed) यांना बिनशर्त पणे सरपंच पदासाठी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सौ अश्विनीताई सागर कोल्हे यांचे सरपंच पदाचे पारडे सध्या जड आहे. या सर्वांचे तालुक्यातील विविध मान्यवरांनी स्वागत केले आहे. एखादी व्यक्ती व्यक्तीगत स्वार्थ बाजूला ठेवून चांगल काम करत असेल तर त्यांना सहकार्य केले पाहिजे असं मत विद्यमान सरपंच मा गणेश कोल्हे, उपसरपंच बाबासाहेब घुले यांनी व्यक्त केले.

उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी प्रा मधुकर (आबा) राळेभात, सामाजिक कार्यकर्ते रमेश (दादा) आजबे,नगरसेवक अमित जाधव, विद्यमान सरपंच गणेश कोल्हे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेरमन ॲड जयप्रकाश कोल्हे पाटील, उपसरपंच मा बाबासाहेब घुले, व्हाईस चेरमन विजय खाडे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक हरिदास उगलमुगले, युवा उद्योजक काकासाहेब खाडे, ग्रामपंचायत सदस्य बबन कोल्हे, धनराज कोल्हे, नानासाहेब खाडे, मच्छीन्द्र कोल्हे, अण्णासाहेब कोल्हे, माजी तहसीलदार हरिभाऊ नाना कोल्हे, विलास कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य नाना खाडे, माजी सरपंच बाबासाहेब गर्जे, अस्लम शेख, विक्रम भाऊ फुंदे, गणेश शेठ फुंदे, माऊली खाडे, संजय खाडे यांच्यासह सागर (भाऊ) कोल्हे यांच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्ते, महिला भगिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here