
जामखेड तालुक्यातील राजुरी, शिऊर व रत्नापूर सह नगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील राजुरी, शिऊर व रत्नापूर सह नगर जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील या २०३ ग्रामपंचायत निवडणूकिसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

माहे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणूकांमधून वगळलेल्या (ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मध्ये जामखेड तालुक्यातील राजुरी, शिऊर व रत्नापूर ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकुण २०३ ग्रामपंचायत निवडणूकिसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

यामध्ये अकोले-११, जामखेड-३, कर्जत-८, कोपरगाव -२६, नगर-२७, नेवासा-१३, पारनेर-१६, पाथर्डी-११, संगमनेर-३७, राहाता-१२, शेवगाव-१२, श्रीरामपूर-६, राहुरी-११, श्रीगोंदा-१० ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर- उमेदवारी अर्ज दाखल कालावधी
०५ डिसेंबर- उमेदवारी अर्ज छाननी
७ डिसेंबर- उमेदवारी अर्ज माघारी अखेर दिवस व चिन्ह वाटप
१८ डिसेंबर- मतदान
२० डिसेंबर मतमोजणी
त्यामुळे जामखेड तालुक्यात राजुरी, शिऊर व रत्नापूर या ग्रामपंचायतीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.







