जामखेड रोखठोक

मागील पाच दिवसांपासून जामखेड तालुक्यात फक्त एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. तर सध्या आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटर मध्ये फक्त दोन रुग्णच उपचार घेत आहेत. त्यामुळे ही जामखेडकरांसाठी खुपच दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. मात्र तरी देखील नागरीकांनी मास्क व सुरक्षित अंतर ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे अवहान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुनील बोराडे यांनी केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना अजार हा गेला नसला तरी दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मात्र वेगाने कमी होताना दिसुन येत आहे. याचाच भाग म्हणून जामखेड शहरात देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसुन येत आहे. मागील पाच दिवसात फक्त तालुक्यात एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. हे आरोग्य यंत्रणेचे यश म्हणावे लागेल. तर जामखेड शहरासाठी आरोग्य दुत म्हणून ठरलेले आरोळे हॉस्पिटल येथील कोरोना सेंटर मध्ये सध्या फक्त दोनच रुग्ण उपचार घेत आहेत. तर अत्तापर्यंन्त जामखेड तालुक्यात १९९७ रुग्णांनी कोरोनावर मात करुन घरी परतलेत आहेत. त्यामुळे ही जामखेडकरांसाठी खुपच दिलासादायक बातमी म्हणावी लागेल मात्र तरी देखील नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे अवहान आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here