घोडेगाव येथे आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न
जामखेड प्रतिनिधी
जामखेड कर्जत तालुक्याचे व महाराष्ट्र राज्याचे युवकांचे नेते आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घोडेगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
आ. रोहित दादांचे कट्टर समर्थक व खर्डा गणातील पंचायत समितीचे भावी उमेदवार माऊली भोंडवे व राष्ट्रवादीचे युवक नेते ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य गणेश रावण मित्र मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी जल्लोसात आ. रोहित पवार यांना केक भरून वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी गावातील विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले पिंपळगाव आवळा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने या तलावाचे जलपूजन आ. आमदार रोहित (दादा) पवार यांच्या हस्ते करून गावातील लक्ष्मी मंदिर सभा मंडप, गावातील सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता अशा विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले याप्रसंगी मुस्लिम समाजाचे युवक कार्यकर्ते दादांना भेटून मुस्लिम समाजासाठी कादर बादशाह दर्गासमोर सभा मंडप व शादी खाना देणे बाबत दादांना विनंती करण्यात आली. दादांनी मुस्लिम समाजाच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकर हे काम मार्गी लावू असे आश्वासन मुस्लिम युवकांना देण्यात आले.
याप्रसंगी याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवक नेते व ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य गणेश रावण, उपसरपंच अकबर शेख, प्रभू गवळी, किसन भानुसे, राजेंद्र भोंडवे, नारायण भोंडवे, गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर बबन जगताप पाटील, ताहेर पटेल, अक्षय धारूरकर, सेवा सोसायटी चे वाय चेअरमन सेवक आढाल बाबू, राजेंद्र भोंडवे, शंकर विष्णू भोंडवे, शंकर जनार्दन भोंडवे, महावीर पाटील, भास्कर गव्हाळे, स्वप्निल गव्हाळे, बाळू गव्हाळे, जाण मोहम्मद सय्यद, राजू सय्यद, जुनेद पटेल, जहांगीर पटेल, आमीन पटेल, फिरोज पटेल, राजू पाचारे, ईश्वर पाचारे, भोंडवे कृषी सेवा चे अशोक भोंडवे, महबूब शेख, भाऊ मुळे, संजय मुळे, आबा कोंढाणे, इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरील कार्यक्रम माऊली मित्र मंडळाने यशस्वीरित्या नियोजन करून मोठ्या उत्साहात साजरा केला.