या एस टी बस अगाराचे चालक वाहक भागवतायत मोफत प्रवाशांची तहान ;एस टी बस मध्येच केली प्रवाशांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय

जामखेड प्रतिनिधी

एस बस मध्ये प्रवाशांना महागडी विकत पाणी बॉटल घेण्याची वेळ येऊ नये तसेच जेष्ठ नागरिक व लहान मुलांची पिण्याच्या पाण्याची सोय एस टी बस मध्येच व्हावी यासाठी वसई आगारातील चालक व वाहकांनी स्वखर्चाने प्रवाशांसाठी मोफत पाण्याच्या जारच्या माध्यमातून बस मध्येच गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे या चालक वाहकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

एस टी बसचा प्रवास सुखकर प्रवास आसे आपण म्हणतो एस टी महामंडळाकडुन देखील प्रवाशांना आनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, मात्र सध्या तरी देखील आनेक प्रवाशी खाजगी बसने प्रवास करताना दिसतात. त्यामुळे एस टी बस चे आर्थिक उत्पन्न घटत आसताना आपण ऐकत आहोत. मात्र याच प्रवाशांची संख्या कशी वाढेल तसेच जेष्ठ नागरीक व लहान मुलांना एस टी बस मध्येच पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी वसई आगारातील वाहक किरण लटपटे, चालक अजिनाथ बांदल, नितीन खेडकर, आशोक इंगोले, श्रीराम म्हस्कर , इश्वर गर्जे, राजेंद्र सांगळे व तुकाराम भवर या एस टी बस चालक व वाहकांनी स्वखर्चाने प्रवाशांसाठी मोफत पाण्याच्या जारच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे प्रवाशांना महागडी पाणी बॉटल घेण्याची वेळ येत नाही.

वसई आगाराच्या वसई ते अंबाजोगाई अशा दररोज दोन बस नगर, आष्टी, जामखेड, पाटोदा, केज व अंबाजोगाई या मार्गाने धावतात लांब पल्ल्याचा हा प्रवास आसल्याने या बस मधिल जेष्ठ नागरिक लहान मुले व इतर प्रवाशांना या बस मध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी पाणी पिण्याचा जार या चालक वाहकांनकडुन मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे प्रवाशी देखील बस चालु आसली तरी देखील तहान लागल्यावर या जार चे पाणी पिऊन आपली तहान भागवतात.

याबाबत नुकतेच या बस ने प्रवास करत आसलेले खर्डा ग्रामपंचायत चे सदस्य प्रकाश गोलाकार यांनी ही वसई अगाराची बस जामखेड बसस्थानक या ठीकाणी आली आसता त्यांचा सन्मान करुन या चालक वाहकांचे कैतुक केले. याच बरोबर चालक वाहकांनी बस मध्ये केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या सोयी मुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच त्यांचा सन्मान महाराष्ट्राचे परीवहन मंत्री यांनी देखील करावा आशी मागणी प्रवाशांनकडुन होत आहे.

काय म्हणाले चालक वाहक

कोरोना काळात एस टी बस चे उत्पन्न घटत गेले होते. तसेच खाजगी वहाणाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ओढा परीवाहान महामंडळाच्या एस टी बस कडे ओढला जावा. तसेच जेष्ठ नागरिक, लहान मुले व प्रवाशांची बस मध्ये हेंडसाळ होऊ नये व त्यांना चालु बस मध्येच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही चालक वाहकांनी दर वेळी वर्गणी करुन एस टी बस मध्ये मोफत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here