जामखेड ग्रामपंचायचे माजी सरपंच कैलास माने (सर) शिंदे गटात, शिवसेनेच्या जामखेड तालुका प्रमुख पदी झाली निवड

जामखेड प्रतिनिधी

जामखेड ग्रामपंचायचे माजी सरपंच कैलास माने सर यांनी नुकताच नगर येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनसमवेत शिदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांची जामखेड तालुका शिवसेना प्रमुखपदी निवड करण्यात आली. त्यांना नुकतेच निवडीचे पत्र जिल्हा प्रमुख अनिल शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, जिल्हाउपाध्यक्ष लोंढे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, शहर प्रमुख दिलीप सातपुते, पाथर्डी ता प्रमुख विष्णुपंत दाखणे, जामखेड ता.उपप्रमुख संतोष वाळुंजकर, शेवगाव ता प्रमुख आशुतोष डहाळे, कपिल माने, अरबाज शेख, अझर शेख, अभिजित माने, राहुल माने, अक्षय शिंदे, विशाल काशिद, आनंद भोज, यश जाधव, अवधूत वासकर, सोहेल तांबोळी, अक्षय गुरसाळे, बबलू जाधव, गणेश जाधव, अनिकेत जाधव, ऋषिकेश जाधव, रोहित राऊत उपस्थित होते.

हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जामखेड चे माजी सरपंच कैलास माने (सर) यांची शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाच्या जामखेड तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र नुकतेच शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

या पुर्वी देखील माजी सरपंच कैलास माने सर यांची राजकीय पाश्र्वभूमी लक्षात घेतली तर २०० ७ जामखेडच्या मनसे तालुका अध्यक्ष पदी निवड झाली होती. यानंतर प्रस्थापितांना धक्का देत २०१० साली जामखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपद भुषविले होते. भाजप कडुन २०१६ साली नगरपरिषद लढवली होती .विद्यार्थी दशेपासुन सक्रीय राजकारणात सहभागी झाले होते .

निवडी दरम्यान कैलास माने सर म्हणाले की जामखेड तालुका शिवसेनेची तालुका प्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.येथुन पुढील काळात जामखेड तालुक्यात शिवसेनेचे काम तन मन धनाने करेल .येणाऱ्या काळातील जामखेड तालुक्यातील होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेसह सर्व निवडणुका ताकदीने लढवणार आणि पक्षाची तालुक्यात शिंदे गटाची सत्ता आणणार असे मत व्यक्त केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here