जामखेड प्रतिनिधी

जामखेड  तालुक्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड च्या वतीने दरवर्षी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात येते याच अनुषंगाने या वर्षी देखील कील्ले बनवा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश भाऊ गायवळ यांच्या हस्ते संपन्न झाली.

यावेळी प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ नगरसेवक महेश निमोणकर, कुसडगाव चे सरपंच हवा सरनोबत,मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, गायकवाड सर, रमेश वाटाडे, लक्ष्मीकांत काळे ,गणेश जोशी, सचिन देशमुख, सुंदर काका देशमुख, मयुर देशपांडे, उत्कर्ष कुलकर्णी, धनवडे भाऊसाहेब, रमेश वाटाडे, नाना खंडागळे, डॉ कुडके मॅडम, सह आदी मान्यवर उपस्थित होते.

विजेते स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक ओम गणेश घोरपडे, सौरभ सातपुते, यांना विभागुन देण्यात आला. तर द्वितीय-ओम प्रदीप टापरे, तृतीय-विक्रांत रमेश वाटाडे, चतुर्थ-आयुश अविनाश बोधले, पाचवा अथर्व राजेंद्र गोरे, यांना देण्यात आला. सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

शिवप्रतिष्ठान जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग मधुकर भोसले यांनी गडकोट किल्ले यांची माहिती होण्यासाठी व शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांनी अंगीकृत करण्यासाठी किल्ले स्पर्धा घेण्यात येत आहे .शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली विशाळगड ते पन्हाळगड ही मोहीम आहे तरी सर्वांनी यामध्ये सहभाग घेऊन शारीरिक-मानसिक- बौद्धिक विकास करण्यासाठी सहभाग घ्यावा, खर्डा किल्ला मराठ्यांच्या विजयास दोनशे पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खर्डा किल्ल्याची प्रतिमा विजेत्यांना देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here