जामखेड प्रतिनिधी

जागतिक तायक्वांदो दिनाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने श्री संत वामनभाऊ गड जमादारवाडी जामखेड येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे जिल्हा सचिव संतोष बारगजे त्याचबरोबर जामखेड असोसिएशनचे संजय बेरड, अजित गोरड सर श्री संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक दादासाहेब महाराज सातपुते, कैलास नेटके, दादासाहेब शिंदे रघुनाथ शेळके, अशोक आजबे व खेळाडू उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यानिमित्ताने गुणवंत खेळाडूंना बेल्ट प्रमाणपत्र देण्यात आले. 

अहमदनगर जिल्हा तायक्वांदो असोसिएशन( पूर्वीचे नाव जीन-सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर) ही संस्था गेल्या २८ वर्षापासून जिल्ह्यात काम करते. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रशी संलग्न असलेल्या या संस्थेने आजवर अनेक गुणवंत खेळाडू घडविले. व ही संस्था नेहमी काहीतरी सामाजिक उपक्रम राबवत असते. ४ सप्टेंबर हा दिवस जागतिक तायक्वांदो दिन साजरा केला जातो.

त्याचेच औचित्य साधून खेळाडू व पदाधिकाऱ्यांनी व भक्तांनी मिळून येथे हा उपक्रम राबविला.
राहुरी येथील तायक्वांदो प्रशिक्षक बाबासाहेब क्षिरसागर यांनी राहुरी विद्यापीठातून काही दुर्मिळ झाडांची रोपे या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिली . व काही रोपे संत वामनभाऊ महाराज मंदिर समितीच्या वतीने उपलब्ध करण्यात आली. यापूर्वीही येथे काही रोपांची लागवड करण्यात आली होती. पूर्वी व आज लागवड करण्यात आलेल्या वनस्पतींमध्ये आंबा, चिंच, कौट, पेरू, चिकू, आवळा फणस, जांभूळ, बहावा, वड, औदुंबर, चाफा, पिंपळ, लिंब, बेल, रामफळ, सिताफळ, करवंद अडुळसा, नारळ व विविध प्रकारच्या फुल झाडांचा या समावेश आहे.

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड संचलित व महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या प्रेरणेने जामखेड शहरालगत श्री संत वामनभाऊ महाराज मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. दरवर्षी पौष वैद्य अष्टमीला येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते . त्याचबरोबर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथून आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीचे येथील प्रांगणात भव्य रिंगण आयोजित करण्यात येते . प्रत्येक महिन्याच्या एकादशीला परिसरातील भाविक येथे दर्शनाला येतात. येथे असलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत दरवर्षी २५ ते ३० विद्यार्थी विनामूल्य वारकरी शिक्षण घेतात.
हे मंदिर व परिसर प्रशस्त आहे शहरातील लोकांसाठी थोडासे निवांत व निसर्गरम्य ठिकाण म्हणून या परिसराची ओळख आहे.

येथील भव्य प्रांगणात भक्तांना बसण्यासाठी जवळपास पंधरा बाकांची सोय आहे. झाडे वेली फुलझाडे विविध वनस्पतींमुळे या परिसराची शोभा वाढली आहे. त्यातच नव्याने वृक्ष लागवड केल्यामुळे हा संपूर्ण परिसर आता नयनरम्य व निसर्गरम्य होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here