जामखेड प्रतिनिधी : ६ सप्टेंबर

नेहमीच समाज कार्यात आग्रेसर असलेल्या मातोश्री क्रीडा संकुल व मातोश्री लाल आखाडा यांच्या माध्यमातून व आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड शहरात भव्य उत्कृष्ट सजावट गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली असून उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रथम तीन मंडळांना मोठी बक्षिसे व पारितोषके देवून सन्मानित करण्यात येणार आहे. तरी शहरातील गणेश मंडळांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे “ असे आवाहन स्पर्धेचे आयोजक माजी नगरसेवक मोहन पवार यांनी केले आहे.


या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच सर्वच सहभागी गणेश मंडळांना पारितोषके देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या गणेश मंडळासाठी निकष पुढील प्रमाणे आहेत.
पर्यावरण पूरक गणेश मूर्ती ,पर्यावरण पूरक सजावट , ध्वनी प्रदूषण विरहित वातावरण, समाज प्रबोधन – उदाहरणार्थ पाणी वाचवा, बेटी पढाव बेटी बचाव, अंधश्रद्धा निर्मूलन, देशभक्ती, सामाजिक सलोखा सजावट , शालेय , आरोग्य , शिक्षण इतर सजावट ,महिला वंचित घटक सामाजिक बाबतीत सजावट व कार्य, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा : पाणी प्रसाधन ग्रह , वैद्यकीय प्रथम उपचार , परिसर स्वच्छता, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे नियोजन, आयोजनातील शिस्त , पारंपारिक सांस्कृतिक भजन, लेझीम, ,पारंपारिक पद्धतीने टिपरी, ढोलीबाजा, (डीजे न लावता) इत्यादी आकर्षक, शिस्तबद्ध व शांततेत मिरवणूक असावी परीक्षणाचे सर्व अधिकार समिती आयोजकांना असतील व परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.


या स्पर्धेमध्ये बक्षिस मिळविणाऱ्या प्रथम मंडळास १) पारितोषिक ११००० रुपये व मानाची ढाल २)दुसरे पारितोषिक ७००० रुपये तर ३) तिसरे पारितोषिक ३००० रुपये दिले जाणार आहेत.


स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी संतोष घोलप सर 9960475000, उमेश माळवदकर 9423751751, सुरज दादा पवार 9150505072 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





