अभिमानास्पद! पै. सुजय तनपुरेला गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील शिऊर येथील युवा पै. सुजय तनपुरे याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. याच कामाची पावती म्हणून अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन कडून देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा खेळाडू पुरस्कार पैलवान सुजय तनपुरेला जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन कडून देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, जिल्हास्तरीय गुणवंत क्रीडा खेळाडू पुरस्कार २०२३ – २४ आपणास प्रदान करण्यात येत आहे. आपण कठोर परिश्रमाने, मेहनतीने क्रीडा क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारीही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपण क्रीडाक्षेत्रात जे नैपुण्य प्राप्त केले त्याबद्दल आपणास या पुरस्काराने सन्मानित करत आहोत. हा पुरस्कार वितरण समारंभ आज रविवार दिनांक २८ जुलै२०२४ रोजी सायं. ४ वाजता. माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन, अहमदनगर या ठिकाणी होणार आहे.
सुजय तनपुरेने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. अमान येथे सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेत पंधरा वर्षे वयोगटाखाली जामखेड तालुक्यातील शिऊर येथील पै. सुजय तनपुरेने तनपुरेने सुवर्ण पदक पटकावले आहे यामुळे शिऊर सह जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला होता.
2024 अमान येथील 15 वर्षाखालील वयोगटात कुस्ती स्पर्धेत पै. सुजय तनपुरेने सुवर्ण पदक जिंकले आहे यामुळे त्याच्या वर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षात होत आहे. त्याने शिऊरचे नाव सुजयने जगात पोहोचवले आहे. सुजय तनपुरेने मागील वर्षी पार पडलेल्या
सोनीपत येथील एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत शिऊर गावाचा सुपुत्र पै. सुजय नागनाथ तनपुरे याची 68 kg वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून जॉर्डन देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती.
सुजय हा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज येथे पंकज हरपुडे व महेश मोहळ यांच्या मार्गदरशनाखाली सराव करतो. सुजयने दिल्ली, हरियाणा व पंजाब अशा राज्यांच्या मल्लांवरती विजय मिळवत होता व महाराष्ट्राला सुवर्ण पदकाची कमाई करून दिली होती.