जामखेड प्रतिनिधी
जामखेडच्या कु.दीक्षा शाम पंडित या खेळाडूची दि 1 ते 6 सप्टेंबर रोजी केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. दिक्षा हीच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
खेळाडूंना नगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आत्मा मालिका ध्यान पीठ, कोकमठांण, ता.कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय ज्युनियर वुशु अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये अ.नगर जिल्हा संघाला 1 सुवर्ण ,2 रौप्य व 4 कांस्यपदके मिळाली.
सुवर्णपदक विजेते-कु.दीक्षा पंडित रौप्य पदक विजेते- कु.कोमल डोकडे व रोहित थोरात कांस्यपदक विजेते -जय जाधव ,कु.पूजा राळेभात सर्व खेळाडू जामखेड,कु.अंजली ठाकरे व कु.प्रियंका चौधरी -एकलव्य स्कूल, मवेशी
या स्पर्धेमधून कु.दीक्षा शाम पंडित या खेळाडूची दि 1 ते 6 सप्टेंबर रोजी केरळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या सर्व खेळाडूंना नगर जिल्हा वुशु संघटनेचे सचिव व आंतरराष्ट्रीय खेळाडू लक्ष्मण उदमले व उपाध्यक्ष शाम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या सर्व खेळाडूंचे जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले मॅडम ,क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, मा.जि.प.सदस्य प्रा.मधुकर राळेभात, उमेश देशमुख प्राचार्य डॉ.देविदास राजगिरे, प्राचार्य नरके सर, यांनी हार्दिक अभिनंदन केले व राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.