जामखेड प्रतिनिधी

झोपडपट्टीत रहाणारा आसो कींवा अंध विद्यार्थी ते स्पर्धा परीक्षेत याश मिळवतात, मग सर्व सामान्य विद्यार्थ्यांना यश का मिळु शकत नाही, हा विचार करणे गरजेचे आहे. कारण जे जिद्दने पेटुन उठतात तेच खरे यश मिळवतात आसे मत जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

ल. ना होशिंग विद्यालय व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आज दि. २५ अॉगस्ट रोजी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन नुकतेच जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, संचालक सैफुल्ला खान, ल. ना होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य जरे सर, पर्यवेक्षक जगदाळे सर. सर्व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

या वेळी सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा केंद्रात वाचण्यासाठी पुस्तकांचा लाभ घेण्यात यावा यासाठी उपलब्ध करून ठेवलेल्या पुस्तकांचे उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर प्रा. अघाव सर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.

पुढे बोलताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तनाव आसतो. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही ते विद्यार्थी इतर विद्यार्थींनमध्ये गैरसमज पसरवतात. ज्या विद्यार्थ्यांना शाळेत कमी गुण मिळाले तरी पुढे आभ्यासाच्या जोरावर यश मिळवले आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. सोशल मिडीयाचा वापर योग्य करा. कधीही स्पर्धा ही स्वतःशी करा दुसर्यांशी नको.

या वेळी विद्यालयातील शिक्षकांनी मार्गदर्शन करताना सांगितले की करीयर घडवत आसताना विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टीकोन विज्ञानाकडे पहाण्याचा आहे. मात्र विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन मिळावे या साठी या स्पर्धा परीक्षा केंद्राचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील पालकांनी मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले पाहिजे

इयत्ता अकरावी व बारावीच्या कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा परीक्षांची पुर्व तयारी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. प्रत्येक शनीवारी वेगवेगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे आसे मत साळुंके सर यांनी व्यक्त केले.

स्पर्धेच्या युगात टीकायचे आहे स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन यासाठी वेगळे करता येणार नाही. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उत्तर करीअर घडवुन पालकांचे स्वप्न पूर्ण करता येते. स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रा पेक्षा बिहार या राज्याचा निकाल विद्यार्थ्यांचा जस्त लागतो. तसाच स्पर्धा परीक्षांचा निकाल आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा लागावा यासाठी या मार्गदर्शन केंद्राची निर्मिती ल. ना होशिंग विद्यालय केली आहे आसे मत शाळेचे प्राचार्य श्रीकांत होशिंग सर यांनी केले.
या वेळी सचिव श्रीकांत देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्पर्धांमध्ये सरस आसने गरजचे आसते कुठल्याही गोष्टींचा प्रचंड ध्यास घेतल्याशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे धेयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ कसा मिळेल यासाठी शिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे.





