जामखेड प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत, त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी करिअर विषयक मार्गदर्शन व्हावे, यासाठी व त्यांच्या पाठीवर कैतुकाची थाप पडावी यासाठी पाटोदा (गरडाचे) येथील माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गैरव आयोजित करण्यात आला होता.

गुणवंत विद्यार्थ्यांना बांधलेले मानाचे फेटे, मिळालेल्या यशाबद्दल दिलेल्या चकाकणाऱ्या ट्रॉफी, माजी सरपंच यांच्या कडुन मिळालेली कौतुकाची थाप आणि आपल्या पाल्याच्या कौतुक सोहळ्याने भारावून गेलेले पालक. असे विलोभनीय दृश्य जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) येथे पाहायला मिळाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ अॉगस्ट रोजी पाटोदा (गरडाचे) ता. जामखेड येथिल दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या कु. साक्षी गौतम माने, ज्ञानेश्वरी संदीप सासवडकर, साक्षी भाऊसाहेब काळे, मुक्ता विष्णू भाकरे, आश्विनी बाळु खटके, या विद्यार्थ्यांनीचा गैरव करण्यात आला होता. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक तोरडमल यांच्या हस्ते झेंडावन करण्यात आले.

गफ्फारभाई पठाण यांनी ‘गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन’ हा उपक्रम हाती घेतला ही कैतुकाची बाब आहे. यंदाचे त्यांचे हे दहावे वर्ष आहे. या वर्षीही गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला. ‘‘आजही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता अफाट आहे, फक्त त्यास योग्य दिशा देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पाठबळ देण्यासाठी पालकवर्गाने पुढाकार घेतला पाहिजे, असे मत शाळेचे मुख्याध्यापक तोरडमल यांनी सत्कार समारंभावेळी व्यक्त केले. ग.पाटोदा चे संरपच गफ्फार पठाण यांचे दहा ते बारा वर्षे पासुन विद्यार्थींना सदर बक्षीस वाटप करण्यात येते.

यावेळी ग्रामस्थ कल्याण कवादे, मुकुंद कडु, बाबासाहेब माने, अशोक खाडे, नाना कवादे, समीर पठाण, बिबीशन कवादे, खंडुराजे कवादे, मच्छिंद्र लंगे, भाऊसाहेब कवादे, देवा मोरे, पांडु शिंदे, पिंटु कडु पाटील, प्रमेश्वोर मोरे, जोगेंद्र थोरात, शाळेचे शिक्षक बी.एल तोरडमल, मुख्याध्यापक, व्ही.एस पोंदे, बी.के खंडागळे, व्ही.व्ही अनारसे, सी.बी बनकर, यु. एस पाटील, एस.एस वस्तारे, एम.एस मार्कंडे, ए. के शिंदे, शिपाई सी. झेड भैलुमे, आर. पी जमदाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here