जामखेड प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त लोकप्रिय आ.रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी चे नेते शहाजी (काका) राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते महेंद्र राळेभात यांच्या वतीने बीडरोड येथील शिक्षक कॉलनी ते संविधान चौक रॅली काढण्यात आली होती. या रॅली मध्ये महीलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

लोकप्रिय आ.रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उभारलेल्या तिरंगा ध्वजाच्या झेंडावंदन कार्यक्रमाचे औचित्य साधून शहरातील शिक्षक काँलनी येथून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या जागृतीसाठी जामखेड शहरात बीड रोड, विश्वक्रांती चौक, जयहिंद चौक, खर्डा चौक, संविधान चौक पर्यंत भव्य रॅली राष्ट्रवादी चे नेते शहाजी (काका)राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते महेंद्र राळेभात यांच्या वतीने काढण्यात आली होती. यावेळी या रँली मध्ये माहिला व पुरूष यांनी दिलेल्या ‘भारत माता की जय’,‘वंदे मातरम’ आदी घोषणांनी शहर दणाणून गेले हाेते.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनजागृती रॅलीमध्ये युवा नेते संभाजी राळेभात , तानाजी राळेभात, हरिभाऊ आजबे, गजानन राळेभात, बाळासाहेब माने, बाळू राऊत, बंटी माने, फय्याज शेख, निलेश राऊत, कांबळे दाजी, गणेश डोके ,संजय डोके, गणेश राऊत, संतोष कदम,राहुल शिंदे दिलीप डोके, संतोष घोलप, जालिंदर तांगडे, आदी प्रभागातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते. विषेश म्हणजे सदर रॅली मध्ये महीलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती या मध्ये, आरती महेंद्र राळेभात, दिपाली राळेभात, मंगल राळेभात, कल्पना राळेभात, संध्या राळेभात, आशाबाई राळेभात, पुनम राळेभात, सुवर्णा राळेभात, सृष्टी राळेभात, अश्विनी इंगळे, अश्विनी गंडाळ, सारिका गंडाळ, सुनिता कांबळे, सारिका तवटे, शारदा मोरे, मंगल शिंदे, मंगल मोरे, अंजली बडे, सुरेखा राळेभात, राणी राळेभात, रूपाली राळेभात, पुनम घोडेस्वार, प्रज्ञा घोडेस्वार, श्यामल डोके, गायकवाड ताई, पुष्पा चिमटे, वनिता मोहिते, हिराबाई शिंदे, आशाताई यादव, उमा डोके, राजश्री तागडे, सीमा घोलप चंद्रभागा घोलप, कोमल गुंड, आशा बांगर, वंदना ठोसर, सह असंख्य महीला या रॅली मध्ये सहभागी झाल्या होत्या.

यानंतर सदर रॅली जामखेड शहरातील संविधान स्तंभ चौक येथे भव्य १०० फुट उंच (३० मीटरचा) तिरंगा उभारला होता त्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. जनजागृती रॅली यशस्वी होण्यासाठी महेंद्र (काका) राळेभात मित्र परिवाराने परिश्रम घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here