जामखेड प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला व शहरातील खर्डा चौकात शिवसैनिकांनी दानवे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. व केंद्र सरकार व दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने आणी नगर जिल्हा संपर्क मंत्री दादा भुसे नगर दक्षिण संपर्कप्रमुख संजय घाडी व सहसंपर्कप्रमुख डॉ.विजय पाटील यांच्या सुचनेनुसार आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख संजय काशिद, उपप्रमुख गणेश उगले, शहर प्रमुख गणेश काळे, युवासेना सावता हजारे, अल्पसंख्यांक प्रमुख नासिर खान, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, नय्युम शेख, संदिप भुजबळ, सागर गुंदेचा, बंडू डांगरे, नागराज जंगम, बप्पा उगले, बब्रुवान वाळुंजकर, संतोष वाळुंजकर, आकाश आयकर, संदिप शिंदे, श्रीकांत चव्हाण, पांडुरंग उगले, संतोष शिंदे, युवराज उगले, किशोर मोहिते, किरण म्हेत्रे, प्रकाश जाधव, शशी खटावकर, प्रमोद वाघ यांच्या सह अनेक शिवसैनिक व युवासैनिक हजर होते.

सध्या पेट्रोल व डिझेल दरवाढीचा मोठा भडका उडाला आहे. यात जनता भरडली जात आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावरून लक्ष हटविण्यासाठी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना दानवे यांनी या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे चांगलेच राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

शिवसेनेने दानवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला व खर्डा चौकात दानवे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

‘केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मागे देखील शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. आताही शेतकर्‍यांच्या आंदोलनाला ते कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये पाकिस्तान, चीन असे नवनवीन मुद्दे काढून शेतकऱ्यांच्या मुद्दयापासून दुर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांविषयी असलेली त्यांची भावना सातत्याने दानवे यांच्या बोलण्यात मधून आजपर्यंत समोर आली आहे. या सर्वांचा जाहिर निषेध करण्यासाठी रावसाहेब दानवे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. तसेच पेट्रोल व डिझेल दरवाढीचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here