जामखेड प्रतिनिधी

वाघा येथे शेतीचे काम करत आसताना जेसीबी चालकाने स्मशानभुमी मध्ये जेसीबी चालवला नाही तसेच फीर्यादीस अपशब्द वापरला नाही तरी देखील त्याच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी वाघा ग्रामस्थांच्या वतीने मंदीरापुढे गावात धरणे आंदोलन करण्यात आले आहे .

या धरणे आंदोलनात वाघा येथील माजी सरपंच कांतीलाल जगदाळे, गोरख जगताप, भरत बारस्कर, नरसिंग मंडलीक, गणेश सुपेकर, श्रीराम बारस्कर, शहाजी मते, अमोल साळवे, भिमराव बारस्कर, कल्याण जगदाळे, परमेश्वर बारस्कर, शिवाजी मुळे, सतिश सागर, लहु बारस्कर, उत्तम जगदाळे, नाना मते व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

या बाबत वाघा ग्रामस्थांनी दि ३० जुन २०२२ रोजी जामखेड चे तहसीलदार यांना निवेदन दिले होते. या निवेदनातही म्हटले होते की आमच्या गावातील कानिफ गोरख जगताप हा जेसीबी चालक गावातील विलास बाबासाहेब बारस्कर यांच्या शेतात बांध टाकण्यासाठी गेला होता. बांध टाकुन झाल्या नंतर जेसीबी चालक घरी निघून गेला. त्याने स्मशानभुमी मध्ये कुठल्याही प्रकारे जेसीबी चालवला नाही. ही घटना दि १३ जुलै रोजी दाखवण्यात आली आहे व सदरचा गुन्हा हा दि २८ रोजी दाखल करण्यात आला आहे. तसेच फीर्यादीस जेसीबी चालक एक शब्दही बोलला नाही व जातीयवाद केला नाही. हा प्रकार राजकीय हेतुने त्रास देण्यासाठी केला आहे. त्यामुळे जेसीबी चालकावर अन्याय होत आहे.

गावातील काही जणांनी जाणुन बुजुन राजकीय हितापोटी त्रास देण्याचे काम केले आहे. परीणामी अशा प्रकारे खोटा गुन्हा दाखल झाल्याने समाज्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची पोलीस प्रशासनाने व अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून खरा प्रकार समोर आणुन सदरचा गुन्हा मागे घेण्यात यावा असे देखिल ग्रामस्थांच्या वतीने निवेदनात म्हटले होते.

या बाबत वाघा येथिल ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण करण्याचा देखील इशारा निवेदनात दिला होता. याच अनुषंगाने दि ७ जुलै २०२२ रोजी सदरचा दाखल करण्यात आलेला खोटा अॉट्रोसीटीचा गुन्हा मागे घेण्यात यावा यासाठी वाघा गावातील मंदिरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावात शांतता व एकोपा कसा निर्माण होईल या कडे लक्ष देण्याची मागणी धरणे आंदोलना दरम्यान ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here