जामखेड प्रतिनिधी

गेल्या १० वर्षे जिल्हा शिक्षक बँकेच्या सत्तेपासून गुरुकुल मंडळ दूर असूनही आम्ही जिल्ह्यातील सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. सत्तेसाठी नव्हे, जिंकण्यासाठी नव्हे तर सभासद हितासाठी आम्ही निवडणूक लढवित असून सभासद आम्हालाच पुन्हा संधी देणार असून स्वबळावरच शिक्षक बँकेची निवडणूक लढविणार असून पुन्हा एकदा बँकेमध्ये गुरुकुल मंडळाची सत्ता येणार असल्याचा आत्मविश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे यांनी व्यक्त केला.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गुरुकुल मंडळाच्या नुकत्याच झालेल्या जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उमेदवार चाचपणी मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वृशालीताई कडलग,शिक्षक समितीचे सरचिटणीस सिताराम सावंत जिल्हा शिक्षक समिती जिल्हा संघटक विजय महामुनी पाथर्डी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब आंधळे, कर्जत गुरुकुल समितीचे नेते मधुकर रसाळ,कर्जतचे तालुका अध्यक्ष अनिल बंडगर,पेंशन राज्यप्रतिनिधी ऋषिकेश गोरे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रताप पवार यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जवळपास १० उमेदवारांनी बँकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती दिल्या यामध्ये शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष विजयकुमार जाधव ,श्रीमती आशा माने, अशोक घोडेस्वार, शिल्पा घोडेस्वार, उत्तम पवार, संतोष डमाळे, रामेश्वर ढवळे, आजिनाथ पालवे, सचिन अंदुरे यांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या.

यावेळी संभाजी तुपेरे, दत्तात्रय भोसले, जितेंद्र आढाव, संजय घोडके, दत्तात्रय उदारे, अजित गोरड, सुशील पौळ, पोपट तुपसौंदर, नामदेव खलसे, आजिनाथ पालवे, विजय जेधे, अविनाश पवार, शहाजी पांडुळे, किशोर राठोड, नितीन शिंदे, राजेंद्र साठे, विठ्ठल जाधव, संतोष वाघ, अतुल मुंजाळ, राजेंद्र जरे, मंदा पगारे, अष्टेकर मॅडम, स्मिता रसाळ, शितल कदम, ज्योती कावळे, राजश्री पांडुळे, वर्षा जगताप, कविता माने यांसह महिला भगिणी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी स्वागत गुरुकुल महिला आघाडी अध्यक्षा शिल्पाताई साखरे यांनी केले. प्रास्ताविक जामखेड तालुका शिक्षक समिती अध्यक्ष विजयकुमार जाधव यांनी केले सुत्रसंचालन जिल्हा संपर्कप्रमुख प्रताप पवार यांनी केले तर आभार संभाजी तुपेरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here