सूरतः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये असून भाजपच्या संपर्कात असल्याचे तर्क-वितर्क लढवले जात आहे. दरम्यान, आज दुपारी एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे सध्या ११ आमदारांसोबत सूरतमध्ये असून त्यांची भाजप नेत्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेचे निष्ठावान नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाण्या एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यास महाविकास आघाडी सरकार कोसळू शकतं. त्यामुळं शिवसेनेकडून आमदार शिंदे यांना सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. मात्र, शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल लागत असून त्यामुळं महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार असून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
एकनाथ शिंदे हे आज दुपारी गुजरातमधून पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तसंच, आजच्या पत्रकार परिषदेतून ते कोणते मुद्दे मांडणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

एकनाथ शिंदे गुजरातमध्ये
गुजरातमधील सूरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आमदारांसह मुक्कामी असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच, शिंदे यांचा मुक्काम असलेल्या मेरिडियन हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here