जेऊर प्रतिनिधी (अलीम शेख)

शेतात लिंबु वेचण्यासाठी गेलेल्या महीलेवर करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील अंजनडोह येथे आज बिबट्याने पुन्हा हल्ला करुन धडापासून शीर वेगळे केले. करमाळा तालुक्यातील हा दुसरा बळी घेतल्याने शेतकरी वर्गात कमालीचे घबराटीचे वातावरण पसरले आहे.

दोन दिवसांपुर्वीच करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी येथे एका तरुण शेतकऱ्याचा बळी घेतला होता मात्र त्यानंतर आज पुन्हा एकदा एका महिलेचा बळी घेतल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे अंजनडोह येथील गावापासून एक ते दीड किलोमीटरील पोधवडी रोडवरील शिंदे वस्ती येथे धर्मराज बापू शिंदे यांची सून जयश्री दयानंद शिंदे (वय ३५) ही जवळच आसलेल्या शेतात लिंबू वेचण्यासाठी गेली होती. यावेळी अचानक सायंकाळी या बीबट्याने या महीलेवर हल्ला करत ओढत घेऊन गेला. बिबट्याच्या या जबर हल्ल्यामध्ये त्या महिलेचे धड सापडले असून बाकीचे पूर्ण अवयव अद्यापर्यंत सापडलेले नाही या कामी अंजनडोह गावातील तसेच वनविभाग व पोलीस कर्मचारी त्या महिलेचे धडापासून वेगळे झालेले अवयव शोधण्यासाठी प्रयत्न करत असून बिबट्याने पुनश्च एकदा अंजनडोह येथील एका निष्पाप महिलेचा जीव घेतल्याने पश्चिम भागातील याशिवाय करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडोळे तहसीलदार समीर माने यांनी भेट दिली असून पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here