जामखेड प्रतिनिधी

कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय काम तसेच नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असलेल्या जामखेड पत्रकार संघाच्या कामाची पावती म्हणून नाशिक विभागात जामखेड पत्रकार संघास आदर्श पत्रकार संघाचा नुकताच गंगाखेड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.याबद्दल जामखेड पत्रकार संघावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

गंगाखेड येथे राज्यस्तरीय पत्रकार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून गंगाखेड चे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे तर प्रमुख पाहुणे म्हणून आयबीएन लोकमत चे वृत्त निवेदक विलास बडे तर अध्यक्ष म्हणून आखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष एस. एम देशमुख होते. यावेळी जामखेड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नासीर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, सचिव मिठुलाल नवलाखा, सहसचिव अविनाश बोधले, खजिनदार सुदाम वराट, जिल्हा प्रतिनिधी यासीन शेख, ज्येष्ठ पत्रकार सुनील कोठारी, समीर शेख, किरण शिंदे, अजय अवसरे, नंदुसिंग परदेशी, जाकीर शेख, रियाज शेख, असिफ सय्यद मोहिद्दीन तांबोळी, संतोष गर्जे, पप्पूभाई सय्यद यांच्या सह अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

पत्रकार मेळाव्यात राज्यातील आठ पत्रकार संघास आदर्श पत्रकार संघाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या मध्ये लातूर विभागातुन नायगाव तालुका पत्रकार संघ जि. नांदेड, औरंगाबाद विभाग सिल्लोड तालुका पत्रकार संघ, जि. औरंगाबाद कोल्हापूर विभाग सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, जि. सिंधुदुर्ग,कोकण विभाग गुहागर तालुका पत्रकार संघ, जिल्हा रत्नागिरी, नाशिक विभाग : जामखेड तालुका पत्रकार संघ जिल्हा अहमदनगर पुणे विभाग फलटण तालुका पत्रकार संघ, जिल्हा सातारा, अमरावती विभाग रिसोड तालुका पत्रकार संघ, जिल्हा वाशिम, नागपूर विभाग नरखेडा तालुका पत्रकार संघ, जिल्हा नागपूर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वरील तालुका पत्रकार संघांना स्मृतिचिन्ह, मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गंगाखेड येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.यानंतर कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार, माजी मंत्री प्रा राम शिंदे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सह अनेक मान्यवरांनी पुरस्कार मिळाला त्या बद्दल अभिनंदन केले.

यावेळी विलास बडे यांनी आजच्या पत्रकारीतेची दिशा व दशा तसेच ग्रामीण पत्रकारांंसमोरील आव्हाने याविषयी सविस्तर विवेचन केले.
तसेच अध्यक्ष एस एम देशमुख यांनी यांनी सांगितले की, पत्रकार संरक्षण कायदा झाला पण आंमलबजावणी नाही हे दुर्दैव आहे. पत्रकाराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही. फक्त प्रसिद्धी हवी आहे.या वेळी गंगाखेड तालुका पत्रकार संघाने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले त्यामुळे देखील त्यांचा देखील गैरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here