जामखेड प्रतिनिधी

मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदार रोहित पवार हे नवीन विकास पर्व आहे. त्यामुळेच कर्जत-जामखेडची ओळख एक माॅडेल मतदारसंघ म्हणून होईल. अशा लीडरला मतदारसंघाने जपले पाहिजे असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र शासन यांच्या विशेष सहकार्यातून व आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन समारंभ दि २ मे रोजी दुपारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व आमदार रोहित पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे, प्रांताधिकारी अजित थोरबोले, ग्रामिण आरोग्य प्रकल्पाचे संचालक डॉ. रवी आरोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, डॉ भास्कर मोरे, डॉ.सुनिल बोराडे, डॉ संजय वाघ, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, सभापती राजश्रीताई मोरे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, रमेश आजबे, हनुमंत पाटील, सोशल मिडीया चे काकासाहेब कोल्हे, यांच्या सह आशा सेविका सर्व वैद्यकीय कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, या अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालया मुळे जामखेड तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे. खाजगी दवाखान्यात होणारे सर्व अत्याधुनिक उपचार आता उपजिल्हा रुग्णालयामुळे जामखेड मध्ये शक्य होणार आहेत. सुसज्ज आयसी यु असेल, सीटी स्कॅन असेल, एम आर आय, सोनोग्राफी तसेच कर्मचाऱ्यंसाठी अत्याधुनिक निवास उपलब्ध होणार आहेत. पुढे बोलताना टोपे म्हणाले की, आपण आजारीच पडू नये म्हणून गावा गावात योगा शिबीराचे आयोजन केले पाहिजे तसेच आपला आहार विहार योग्य असायला पाहिजे.

या वेळी आमदार रोहित पवार म्हणाले की उपजिल्हा रुग्णालयाचा सामान्य लोकांना फायदा होईल. मतदारसंघात काम करत आसताना लोकांची विकास कामांनबाबत मागणी आसते. लोकांच्या आडचणी सोडवत असताना आरोग्य आणि शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. खाजगी शांळांनप्रमाणेच जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील दुर्लक्ष करून चालणार नाही. फीरत्या दवाखान्याच्या माध्यमातून ८० हजार लोकांवर उपचार केले आहेत. कर्जत जामखेड मध्ये सामान्य लोकांचे मॉडेल बनत आहे. कोविड काळात कर्जत जामखेड तालुक्यातील सेंटर मध्ये २३ हजार लोकांना सेवा दिली आहे. पुण्या पेक्षा चांगली इमारत मला कर्जत जामखेड ला बांधायची आहे. ८० आरोग्य कर्मचार्‍यांसाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कर्जत जामखेड साठी डायलेसिस सेंटर द्यावे तसेच खर्डा कींवा माहीजळगाव या ठिकाणी ट्रोमा सेंटर द्यावे अशी मागणी देखील आ. रोहित पवार यांनी राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. एकाच मतदार संघात तीन उपजिल्हा रुग्णालय मंजुर केले. आपल्या मतदारसंघात आरोग्य सेवा चांगली करायची आहे याचा फायदा आपल्या बरोबर बाहेरच्या तालुक्यातील लोकांना देखील झाला पाहिजे. प्रायव्हेट हॉस्पिटल ने देखील ती सेवा दिली पाहिजे. बारामती प्रमाणे देखील कर्जत जामखेड मध्ये मेडिकल हब म्हणून ओळखले पाहिजे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here