जामखेड प्रतिनिधी

एक ते दीड महिन्यापासून मिलिंदनगर भागातील दुरूस्तीकरीता तोडफोड करून ठेवलेल्या शौचालयामुळे या भागातील महीलांची गैरसोय निर्माण झाली होती. या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे यांनी नगरपरिषदेकडे पाठपुरावा केल्यानंतर या तोडफोड करून ठेवलेल्या शौचालयाच्या दुरूस्तीस सुरूवात करण्यात आली.

जामखेड शहरातील मिलिंदनगर मधील महिला शौचालयाची दुरावस्था झाल्याने मागील एक ते दीड महिन्यापासून तेथे असलेल्या तीन शौचालयांची दुरूस्तीकरीता तोडफोड करून ठेवली होती. दुरुस्ती करण्यासाठी या महिला शौचालयाचा वापर मिलिंद नगर, भुतवडा रोड येथील महिलांकडून मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, नगरपरिषदेच्या माध्यमातून दुरुस्ती करण्याचे काम चालू केले व चार पैकी एकच शौचालय वापरात राहिले त्यामुळे महिलांची कुचंबणा होऊन त्यांना मोठ्या मन:स्तापाला सामोरे जावे लागत होते. हे काम अर्धवट स्वरूपात असल्याची माहिती समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, सुपरवायझर टेकाळे, मिलिंद घायतडक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला,परिणामी आज दि. २२ एप्रिल रोजी प्रतक्षात कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच महिन्यापासून होत असलेली गैरसोय दूर होणार असल्याने परिसरातील महिलांमधून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान काही दिवसांपुर्वीच मिलिंदनगर भागातील शेकडो गोरगरीब चार दशकांपासून ज्या नळाच्या माध्यमातून आपली तहान भागवतात त्या दोन नळांपैकी एक नळ रात्रीच्या वेळी अज्ञात व ‘संवेदनाहीन व्यक्तिकडून’ तोडून गायब केला गेला. उन्हाळ्यात हा नळ म्हणजे इथल्या नागरिकांसाठी मोठा आधार ठरतो. या भागातील युवक कार्यकर्ते प्रा.राहुल आहिरे यांना सकाळी याबाबतची माहिती समजताच सरकारी यंत्रणेची वाट न पाहता (त्यांच्या मते, असे नळ बंद झालेले आहेत सबब मटेरियल नाही.) स्वखर्चाने नळ बसवून घेतला. व याभागातील माताभगिनींची गैरसोय व पाण्याचा अपव्यय दूर केला. प्रा.राहुल आहीरे यांनी केलेल्या या दोन्ही कामांमुळेही त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here