जामखेड प्रतिनिधी
बचत गटाच्या माध्यमातून महीलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. महीलांना आर्थिक ताकद देऊन त्यांच्या हाताला काम देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. असे मत कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सौ. सुनंदा ताई पवार यांनी उद्घाटन प्रसंगी महीलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
मा. आ. रोहीत दादा पवार, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था आयोजित, स्वयंसिद्धा हे तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन आज पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सौ. सुनंदा ताई पवार, जिल्हा उद्योग केंद्र अतुल दवांगे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, खादी ग्रामोद्योग केंद्र बी आर मुंडे, महिला बाल विकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, सभापती राजेश्री ताई मोरे, ता. कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, कंपनी तज्ञ शुभांगी चौधरी, शार्प इंजि वर्क्स रविराज भालेराव, मिल्क फूड प्रतिनिधी प्रसाद सर, अनोश इंडस्ट्री भोसले, युवा नेते प्रविण उगले, सागर शिदे, प्रशांत हिरवे सह आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फित कापून करण्यात आले.
पुढे बोलताना, सुनंदा ताई पवार म्हणाल्या की, कर्जत – जामखेड येथील सर्व महिला सक्षम झाल्या पाहिजेत, पुरुष आत्महत्या करतात मात्र, आपल्या मुलांसाठी ती जिवंत राहते, रोहित दादांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत – जामखेड येथील महिला सक्षम करायच्या आहेत. आहार, आरोग्य तपासणी, स्वच्छता, ताण तणाव, बालविवाह, मुलींना शिकवा, प्रगतिशील शेती, अशा एक ना अनेक विषयांवर यावेळी त्यांनी महिला मार्गदर्शन केले.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी बोलतांना सांगितले की या प्रकारचे ग्रामीण भागात पाहिलेले हे महिलांसाठीचे हे पहिले प्रदर्शन आहे. अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.