एकाच दिवशी दोन महीलांवर झाला होता हल्ला
जामखेड प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील पारगाव येथे एकाच दिवशी बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठीकाणी केलेल्या हल्ल्यात एका महीलेचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी आमदार सुरेश आण्णा धस यांच्यासह वनविभाग टिम घटना स्थळी दाखल झाली आहे.
आष्टी तालुक्यातील पारगाव येथे आज दि २९ रोजी सायंकाळी सायंकाळी सहा वाजता शेतातुन कापुस वेचुन घरी आपल्या पती सोबत येणाऱ्या सूरेखा निळकंठ भोसले (बळे) वय ५० वर्षे या महीलेवर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याच्या हल्ल्यात महीलेचा जाग्यावरच मुत्यू झाला. घटने दरम्यान तीचा पती बिबट्या मागे पळत आसताना बेशुद्ध पडला. दोघेही घरी लवकर न आल्याने घरच्यांनी या दोघांचा शोध सुरू केला त्यावेळी सदरची घटना उघडकीस आली. सदरची घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पारगांव जोगेश्वरी येथुन वनविभागाचे पथक देव्हिगव्हाण कडे गेल्यानंतर मागे बिबट्याने हल्ला केला.