जामखेड प्रतिनिधी : ११ डिसेंबर

देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचे कर्तृत्व व राजकीय काम खुप मोठे आहे. पवार साहेबांच्या राजकारणातील तत्कालीन प्रवेशाने महाराष्ट्राच्या राजकारणात खऱ्या अर्थाने विकासात्मक गतीमानता आली होती. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचे कार्यक्रम साजरे होत आहेत. त्या निमित्ताने मोहन पवार यांनी चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.

देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक व मातोश्री लाल आखाडाचे संचालक मोहन पवार यांच्या वतीने जिल्हा परिषद तपनेश्वर या शाळेत विद्यार्थ्यांनचे रक्तगट तपासणी, खाऊ वाटप व सत्कार समारंभ अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महाराजांच्या मुर्तीची विधीवत पुजा करून करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचलिका डॉ. शोभाताई आरोळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत जामखेडचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, माजी नगरसेविका राजश्रीताई पवार, युवक नेते मोहन (वस्ताद) पवार, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, शिक्षक नेते अर्जुन पवार, मुख्याध्यापिका वराट मॅडम, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रा. प्रदीप (कुंडल) राळेभात, जामखेड पॉलिटेक्निक काॅलेजचे प्रिन्सिपॉल विकी घायतडक, भिमटोला सामाजिक संघटनांचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र आदे, कोअर कमिटी सदस्य बाळासाहेब डोकडे, जेष्ठ नेते प्रकाश सदाफुले, युवक शहराध्यक्ष अमोल गिरमे, कुसडगावचे माजी उपसरपंच महादेव कात्रजकर आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये कर्जत उपविभागाचे पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, डॉ. शोभाताई आरोळे, व्हिजन फिल्म प्रोडक्शनची सर्व टीम, एस. के. फिल्म प्रोडक्शनची सर्व टीम, पत्रकार संतोष बारगजे व धनराज पवार यांचा सामावेश होता. यावेळी बोलताना डॉ. आरोळे हाॅस्पिटलच्या संचलिका डॉ. शोभाताई आरोळे, आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

दरम्यान पहिली ते चौथीच्या ११२ विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. यासाठी ग्रामीण रुग्णालय जामखेडचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी शाम जाधवर, अधिपरिचारक किशोर बोराडे व महालॅबचे अल्ताफ सय्यद यांनी काम पाहिले.
सुत्रसंचल विजय जाधव यांनी तर आभार मोहन पवार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here