कर्जत प्रतिनिधी

घरात अठराविश्व दारीद्र्य त्यातच दोघेही पती पत्नी अपंग, भाऊ मतिमंद, अशा परीस्थितीत घर पडके आसल्याने छोट्या बाळाला सोबत रहायचे कोठे असा प्रश्न या अपंग पती पत्नीला पडला आहे. यासाठी त्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.

ही व्यथा आहे दोन्ही पायांनी अपंग असलेले आणि संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी अंगावर पेलणाऱ्या कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील अपंग संतोष रायचंदजी गेलडा यांची. लग्नानंतर २० वर्षानंतर १ मुलगा झाला. नवरा- बायको दोन्हीही शरीराने अपंग. घर जुने खनाचे आणि पडके असल्याने घरात साप-विंचू अशा प्राण्यांच्या वावरणं चालू असे अशा परिस्थितीत देखील हे कुटुंब आपल्या या बाळाला घेऊन कसेबसे राहत असत. गावातील श्री. फाळके यांनी माणुसकी नात्याने आपली जागा त्यांना 2 ते 3 वर्षे विनामूल्य राहण्यासाठी दिली. कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला नाही. आता पडलेले घर त्यांना बांधायचे आहे जवळ पैसे नाहीत. आपल्या लेकरासाठी निवारा महत्वाचा आहे.

संतोष (बाबु) म्हणतात की आमचं काय आता आयुष्य संपत आलयं .घरात वयस्कर वडील, भोळा भाऊ, आणि आम्ही दोघेही अपंग त्यामुळे आत्ता पर्यंतच्या आयुष्यात काही बचत करुन ठेवणं झालंच नाही पोट भरायचं फक्त. आता माझ्या मुलासाठी मला करायचं आहे पण वय संपलं ! त्यामुळे आपणास मी आणि माझे कुटुंब मदतीची हाक देत आहोत. आपल्या फुल ना फुलाच्या पाकळी मुळे मी माझं घर उभारू शकेल!

या अपंग पती पत्नीची हाक एकुण जामखेड तालुक्यातील कांतीलालजी कोठारी, अमोल तातेड, अशोकजी चोरडीया (गेवराई), अमितजी लुनावत, अभयजी बोरा, अमोलजी कोचेटा, अश्विनी संकलेचा, प्रफुल सोळंकी,
दीपक ललवाणी, आनंद जैन (जवळा) या दानशूर व्यक्तींनी त्यांना आर्थिक मदत केली आहे. तसेच ज्या दानशुर व्यक्तींना आर्थिक किंवा वस्तुस्वरूप मदत करायची आहे त्यांनी मो. 70577 47137, 9420656104, 8087700070 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here