जामखेड प्रतिनिधी
जागतिक अपंग दिन म्हणून दि 3 डिसेंबर रोजी साजरा केला जातो याचे औचित्य साधून शिक्षक बँक जामखेड, शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळ यांचे वतीने जामखेड तालुक्यातील सर्व दिव्यांग शिक्षक बांधवांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ होते तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष राम निकम ,शिक्षक बँक संचालक सौ. सीमा निकम हे होते. यावेळी जिल्हा अपंग संघटनेने दिव्यांग भूषण पुरस्काराने गौरविलेल्या सौ .निर्मला गौतम काळे उपा जि. प. प्रा. शाळा शिऊर यांना दिव्यांग भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव सुभाष फसले, बळीराम जाधव, बालाजी चव्हाण, संतोषकुमार वांडरे ,नारायण लहाने,आनंद राऊत,रमेश दराडे, रुपेश वाणी, निलेश कांबळे, संतोष कदम, विलास बोबडे, ज्योती राऊत, शैला देवगुडे, सुमन अलमले, सारिका पोले आदींना पुस्तक व गुलाबपुष्प देऊन अपंग दिनानिमित्त मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पृथ्वीराज प्रमोद पिंपरें याची नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .तसेच कोरोना काळात मृत्यू पावलेले कै. राजेंद्र कुमटकर व कै.नागनाथ कोनकेवाड यांचे वारसास पाच लाख रुपयांच्या चेकचे वितरण करण्यात आले .यावेळी प्रास्ताविक शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष राम निकम यांनी केले .बँकेच्या योजनांची माहिती सौ.सीमा निकम यांनी दिली.यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी बँकेच्या या उपक्रमाचे स्वागत करून दिव्यांग शिक्षक हे चांगल्या शिक्षकांच्या बरोबरीने उत्कृष्ठ काम करतात त्याना सहानुभूतीची नाही तर विश्वास देण्याची गरज आहे त्यामुळे त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू तसेच दिव्यांग शिक्षकांसाठी तालुका स्तरावर देखील गुणगौरव कार्यक्रम घेतला जाईल असे सांगितले,तालुक्यातील सर्व शिक्षकांनी गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले, शिक्षकांच्या प्रश्नासाठी कधीही माझ्याकडे या मी सदैव ते सोडवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले, गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी माझे स्तरावरील सर्व पेंडिंग कामे पूर्ण केली आहेत राहिलेल्या कामासाठी वारंवार पाठपुरावा करा मी ते त्वरित सोडविण असे आश्वासन दिले सर्व दिव्यांग बांधवाना व निर्मला काळे यांना अपंग दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सर्वानी चांगली विद्यार्थ्याची तयारी करून घेण्याचे आवाहन केले, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर व विजय रेणुके यांनी केले तर आभार वैजीनाथ गीते यांनी मानले. यावेळी शिवाजी हजारे, हनुमंत निंबाळकर, प्रवीण पवार, विजयकुमार रेणुके, शिवाजी घोडके, नितेश महारनवर, राजेश्वर डुंपलवाड, नवनाथ बडे, रवींद्र तांबे, अनिल कुलकर्णी, नामदेव गर्जे, ब्रम्हदेव हजारे, विठ्ठल जाधव, प्रमोद पिंपरें, भागवत निंबाळकर, प्रकाश राठोड, गौतम काळे, संतोष वाघ ,ज्ञानोबा राठोड, विठ्ठल घोडे आदी शिक्षक हजर होते.






