जामखेड प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील नागरीकांनवरील बिबट्याचे हल्ले सुरूच आसुन आज सकाळी पुन्हा पारगाव येथे शालन शहाजी भोसले या शेतातील गवत घेऊन येत आसताना बिबट्याने अचानक हल्ला त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महीला गंभीर जखमी झाली आसुन तीच्यावर आष्टी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आष्टी तालुक्यातील मंगळुर येथील दिंडे वस्तीवरील शेतात महीला तुरीच्या शेंगा तोडत असताना बिबट्याने या महीलेवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच दुसर्या दिवशी देखील बीबट्याची दहशत कायम आहे. दुसर्या दिवशी रविवार दि २९ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शालन शहाजी भोसले या आपल्या पारगाव येथील शेतातुन गवत काढुन गावात घेऊन येत आसताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महीला गंभीर जखमी झाली आसुन तीच्यावर आष्टी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सतत बिबट्याचे लोकांवर हल्ले होत आसल्याने नागरीकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.