जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील कुपोषित लहान मुलांना अंगणवाडीतुन देण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. दि २४ रोजी खंडोबानगर भागातील अंगणवाडीतुन सकाळी दिलेल्या आहारात आळ्या आढळून आल्या आहेत. कुपोषित मुलांना दिला जाणारा हा कसला पोषण आहार ? हा तर कुपोषण आहार! अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

कुपोषित मुलांना जेवणात दाळ, भात, चपाती, आलु तसेच नाष्ट्याला चने, चवळी, मुग अशा प्रकारे कूपोषित मुलांना डब्यातून आहार दिला जातो. सदर आहाराचे डबे पालक अंगणवाडीतुन घेऊन जातात. एका कुपोषित मुलांच्या पालकाने रोजच्या प्रमाणे घरी मुलांला आहार देण्यासाठी डबा उघडला असता पातळ दाळीमध्ये आळ्या दिसुन आल्या. दाळ खाली वर करून ताटात ओतली असता आणखी आळ्या दिसल्या. त्या पालकाने आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक संतोष नवलाखा यांना फोन केला. नवलाखा यांनी घरी जाऊन पाहिले तसाच डबा घेऊन महिला व बालकल्याण आधिकारी यांच्या कार्यालयात गेले मात्र सदर महिला आधिकारी सुट्टीवर असल्याचे समजले. त्यांना फोनद्वारे घटनेची माहिती दिली. हे लोकवर्गणीतून चालत असलेल्या आरोळे यांच्या संस्थेमार्फत कुपोषित मुलांना डब्बे दिले जातात त्यांच्याशी मी बोलते असे महिला आधिकारयांनी सांगितले.आणखी पालकांकडे चौकशी केली असता असा प्रकार यापूर्वीही घडला आहे. मात्र हे लोक गरिब आहेत त्यांची मुलं कूपोषित आहेत. ते काही बोलले तर त्यांना हा आहार मिळणार नाही. या भीतीने कोणीही काहीही सांगत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here