जामखेड प्रतिनिधी

मुलांची हैस भागवण्यासाठी पालक आपल्या मुलांच्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च करतात मात्र जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस वयोवृध्द व निरागस मुलांसोबत साजरा करुन एक आदर्श निर्माण केला असे मत कैलास महाराज नेटके यांनी व्यक्त केले.

वाढदिवस म्हटले की पार्ट्या, आतिशबाजी, पैश्यांची उधळपट्टी व आत्ताच्या पिढीचा आवडता केक तोंडाला फासण्याच्या कार्यक्रम असे चित्र डोळ्यापुढे उभे रहाते. मात्र खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी पडणारी व आपल्या आनंदात इतरांना सामावून घेत आनंद द्विगुणीत करणारी व्यक्तिमत्वे वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीत देखील एक वेगळेपण जपतात.हे वेगळेपण समाजासाठी आदर्शवत ठरते. असेच वेगळेपण भिमटोला सामाजिक संघटनांचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांनी जपले आहे.

भिमटोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांनी आपली मुलगी कु. प्रज्ञा हिचा वाढदिवस
श्री. संत वामनभाऊ सामाजिक संस्था संचलित नवज्योत प्रकल्पातील वयोवृध्द व निरागस मुलांसोबत साजरा केला यावेळी त्यांना उत्कृष्ट जेवन देण्यात आले. यावेळी कैलास महाराज नेटके म्हणाले की, तरुणांना मी आव्हान करेन की, पुढील काळात कोणताही बडेजाव न करता निरागस वयोवृध्दांसोबत वाढदिवस साजरे करून समाज कार्यास हातभार लावावा. तो आनंदच वेगळाच असतो. यावेळी नायगांव माजी सरपंच शिवाजी ससाणे, अध्यक्ष विशाल अब्दुले, युवा उद्योजक गणेश घायतडक उपस्थित होते व प्रज्ञाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतोष गर्जे यांनी तर आभार बापूसाहेब गायकवाड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here