जामखेड प्रतिनिधी

एखाद्या प्रश्नावर काम करत आसताना ते काम आवडण्यापेक्षा सोडवणे कधीही महत्त्वाचे आसते. अधिकारी व पदाधिकारी यांचा समन्वय असला तर कुठलेच काम करताना अडत नाही. तसेच अधिकारी व पदाधिकारी हे प्रशासनरुपी दोन चाके आहेत असे मत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व्यक्त केले.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त येथील कर्मचार्‍यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते या वेळी सत्कार मुर्ती पोळ बोलत होते. यावेळी सभापती राजश्री सुर्यकांत मोरे, तहसीलदार योगेश चंद्रे, महीला बालकल्याण अधिकारी ज्योतीताई बेलेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल बोराडे, माजी सभापती डाॅ.भगवान मुरुमकर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रा मधुकर अबा राळेभात, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, अ. नगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल उगले, माजी सभापती सुभाष अव्हाड, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, संजय कोठारी, मंगेश आजबे, गैतम उतेकर, महाराष्ट्र राज्य ग्रामविकास युनियन चे जिल्हा कार्याध्यक्ष युवराज ढेरे पाटील, राम निकम सर, उद्दव हुलगुंडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या नंतर तहसीलदार योगेश चंद्रे, सभापती राजश्रीताई सुर्यकांत मोरे, डॉ भगवानराव मुरुमकर, दत्तात्रय वारे, अमोल राळेभात व प्रा मधुकर अबा राळेभात यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली व गटविकास अधिकारी यांच्या कामाचे कैतुक केले.

गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ यांनी यापूर्वी पंचायत समितीमध्ये लोकसहभागातून वाचनालय सुरु केले आहे, आज वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले, यावेळी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शाल व हार आणण्याऐवजी पुस्तके भेट द्यावी असे आवाहन केले यास प्रतिसाद म्हणून शिक्षक राम निकम ,अनिल कुलकर्णी व सर्व शिक्षकांनी पंचायत समिती मध्ये सुरू केलेल्या वाचनालयास 101 पुस्तके भेट दिली.

पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर तीन ठिकाणी आयोजीत केलेल्या रक्तदान शिबीरात पंचायत समिती सभागृहात – ५८, रक्त संकलन ल. ना. होशिंग-४२ आणि खर्डा येथे ५१ अशा १५१ व्यक्तींनी रक्तदान केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here