जामखेड प्रतिनिधी

खर्डा येथे लावण्यात आलेला भारतातील सर्वात उंच स्वराज ध्वज हा पक्षाचा नसुन महाराष्ट्रातील तमाम जनतेचा आहे. या भगव्या ध्वजाचे राजकारण मी करणार नाही व होऊ देणार नाही मात्र जे राजकारण करेल ते विकासाचे राजकारण आसेल असे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील खर्डा येथे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात उंच झेंडा भगवा ‘स्वराज्य ध्वज’ आज दि १५ अॉक्टोबर रोजी म्हणजे विजयादशमीच्या मुहूर्तावर उभारण्यात आला. स्वराज्य ध्वज यात्रेचा प्रवास ९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत झाला. १२ हजार किलोमीटरचा हा प्रवास होता. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, देशातील ६ राज्यांचा प्रवास करत हा ध्वज आज खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्या समोर फडकविण्यात आला. या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी स्वराज्य व भगव्या ध्वजाबाबत आपले विचार मांडत जात व धर्मावर राजकारण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली.

कार्यक्रमा दरम्यान आखील भारतीय वारकरी संघटनेचे अध्यक्ष हभप प्रकाश महाजन बोधले, शिक्षण क्षेत्रातील तंज्ञ डिजिटल शिक्षक डिसले गुरूजी, राहिबाई पोफळे, कलावंत मंगलाताई बनसोडे, अनुराधा गोरे, अवधूत गांधी सह मोठ्या संख्येने विद्यमान आमदार उपस्थित होते.

आमदार रोहित पवार म्हणाले, एकता व समानतेच्या विचाराने जातीभेद व धर्मभेद विसरून आपण येथे स्वराज्य ध्वजाला मानवंदना देण्यासाठी आलो आहोत. काहीजण स्वराज्याच्या भगवा ध्वजाचा वापर ठराविक जाती अथवा धर्मापूर्ता करून जाती धर्मात विभाजन करत आहेत. जाती व धर्म भेदातून काहींना फायदा होतो म्हणून ते असे करतात.

स्वराज्य ध्वज हा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या ताकदीचे प्रतीक आहे. मला या यात्रेतून प्रसिद्धी मिळवायची नाही. प्रसिध्दी साठी या यात्रेत मी सहभागी झालो नाही. भगवा ध्वज सर्वांसाठी आहे. ज्या ज्या परिसरात धार्मिक स्थळांवर, शौर्य स्थळांवर हा ध्वज गेला तेथे सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिकांनी या ध्वजाचे स्वागत केले. याचा मला अभिमान वाटतो. या यात्रेत केवळ ध्वजाला महत्त्व हा विचार मला पुढे न्यायचा होता असे देखिल आ. रोहित पवार म्हणाले.

स्वराज्य ध्वज हा ९६ तीर्थ स्थळावर फीरुन आलेला आसल्याने या ठिकाणी आसलेल्या मातीचे देखील महत्त्व आसल्याने त्या ९६ ठीकाणाहु आणलेल्या मातीचे देखील पुजन कारगिल युद्धात शहीद झालेल्या मातेच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वराज ध्वजावर हॅलिकॉप्टर वरुन पुष्प वृष्टी करण्यात आली या वेळी नागरीकांनी जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा दिल्या.

१)चौकट

उपस्थितीत आसलेल्या आनेकांना या कार्यक्रमास कोण कोण राजकीय पदाधिकारी येणार व काय राजकीय घडामोडी घडणार या कडे सर्वांचे लक्ष लागले. मात्र आमदार रोहित पवार यांनी राजकारण बाजुला ठेवून या स्वराज ध्वजाचे पुजन उपस्थित आसलेल्या संत महंत व आर्थिक परिस्थिती बिकट आसताना त्यांनी आपले नाव महाराष्ट्रत झळकवले अशा कर्तृत्ववान महीला व पुरुषांच्या हस्ते करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला.

२)चौकट

स्वराज्य ध्वज जस जसा वर चढवला जात होता तेव्हा सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या अखेर अर्धा तासा नंतर स्वराज्य ध्वज उंच आकाशात झेपावला अन शिवपट्टण किल्ल्याच्या मैदानात एकच जल्लोष झाला. टाळ्यांच्या कडकडाटात स्वराज्य ध्वजाला हजारो नागरिकांनी सलाम केला. या वेळी उपस्थित आसलेले हजारो नागरिक या कार्यक्रमाचे साक्षीदार बनले.या कार्यक्रमामुळे शिवपट्टण किल्ल्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here