जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष श्री. सत्यजीत ( दादा )तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमनगर युवक काँग्रेस चे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले यांच्या संकल्पनेतून बेरोजगार तरुणांसाठी उद्योजक निर्माण अभियान कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.या अभियानात तरुणांनी व्यवसाय कोणता करावा, कसा करावा, कोणत्या व्यवसायात किती फायदा आहे, या माहिती बरोबरच उद्योग-व्यसायासाठी उपलब्ध असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली जाईल.
साक्षरता एवढी वाढली आहे की, पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.आपल्याकडे असलेल्या शासकीय आणि खासगी नोकऱ्यांची संख्या कमी होत आहे.आपली व्यवस्था इतक्या सर्वांना नोकऱ्या देऊ शकत नाही म्हणून तरुणांनी आता उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे असे आवाहन अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष राहुल उगले पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here