जामखेड प्रतिनिधी
आ. रोहित पवार यांचे व्हीजन खुप मोठे आहे. यांच्या कार्य पद्धतीवर प्रभावीत होऊन तसेच विकासाला साथ देण्यासाठी मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसापुर्वीच आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत कर्जतमधील भाजपचे प्रकाश ढोकरीकरांसह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. या अनुषंगाने ते जामखेड मधिल पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आमदार रोहित पवार हेच कर्जतचा सर्वांगीण विकास करू शकतात. त्यांनी केलेल्या कामाने आम्ही प्रभावित झालो आहोत. पक्षा पेक्षा विकास महत्त्वाचा आहे. स्वप्नातील कर्जत व जामखेड शहर उभे करण्यासाठी तसेच विकासाला साथ देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे असे देखिल ढोकरीकर म्हणाले.
येणाऱ्या कर्जत व जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चा सत्ता येणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादी मध्ये मी कुठल्याही दबावापोटी गेलो नसुन स्वच्छेने गेलो आहे.






