संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागुन राहिलेल्या जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत नुकतीच आज २७ नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत पार पडली. जामखेड येथील तहसील कार्यालयासमोर आज सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांनी लाहान मुलांच्या हातांनी चिठ्या काढून सर्व आरक्षण जाहीर केले.   या मध्ये प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक २ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ३ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक ४ नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग क्रमांक ५ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक ७ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ८ अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक ९ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक १० सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ११ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक १२ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक १३ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १४ अनुसूचित जाती व्यक्ती, प्रभाग क्रमांक १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग, व्यक्ती प्रभाग क्रमांक १६ सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग क्रमांक १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग क्रमांक १८ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १९ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक २० नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक २१ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, अशा प्रकारे जामखेड नगर परिषदेचे आरक्षण सोडत कर्जत-जामखेडच्या प्रांताधिकारी मा. अर्चना नष्टे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. यावेळी आरक्षण सोडत लहान मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढून करण्यात आले.  यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते , शेळके , राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर आबा राळेभात, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात पाटील, नगरसेवक दिगंबर चव्हाण, मोहन वस्ताद पवार ,अमित जाधव, नगरसेवक गणेश  आजबे ,उमरभाई कुरेशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष जमीर सय्यद, विकी सदाफूले ,नासीर सय्यद , युवा नेते महेश राळेभात, अमोल  गिरमे,गणेश राळेभात, कुंडल राळेभात ,आदी  कार्यकर्ते उपस्थित होते,  जामखेड नगरपरिषदेच्या आज च्या आरक्षणामुळे अनेक जुन्या इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आशा भंगल्या असून अनेक युवा कार्यकर्ते मध्ये नवीन आरक्षणामुळे आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे कही खुशी आणि कही गम आसा प्रकार झाला आहे. एन थंडीत जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना या निवडणुकीत पहावयास मिळणार आहे. मात्र शिवसेनेना व कॉंग्रेस ने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, आम आदमी पार्टी हे देखील या निवडणुकीत उडी मारणार असुन स्वतंत्र पॅनल उभे करुन आपली ताकद उभी करणार आहेत. तिसरा पर्याय म्हणून ज्या पक्षाकडून ज्या इच्छुक उमेदवारांच्या तीकीटाचा पत्ता कट होईल ते तीसरी अघाडी स्थापन करणार का याकडे देखील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here