जामखेड प्रतिनिधी

चित्रपट क्षेत्रात नम्रता व सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागले तर नक्कीच संधी मिळत रहाते. जिद्द व मेहनतीने कुठलेही कार्य शक्य होते आसे मत सिनेअभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी सांगितले.

कलाकारांचे योगदान व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने एस के फील्म प्रॉडक्शन चॅनल चे subscribe पूर्ण होऊन 4000 तास पूर्ण झाले आहेत त्याच निमित्ताने रविवार दि.13 रोजी सकाळी सेलिब्रेशन करून पुढील एपिसोड चे नियोजन व चर्चा करण्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. या वेळी दिपक तुपेरे, जितेंद्र आढाव, शहादेव तागड, रजनीकांत साखरे, विजयकुमार जाधव, बाळासाहेब माने, अनिल खेत्रे, सुशील पौळ, राजू मोरे, स्वप्निल सवाई, विनोद घायतडक, रूषीकेश औचरे, संगिता पुलावळे, भाग्यश्री जमदाडे, साहील शेख, सुमित लोळगे, रोहन लोळगे ऊपस्थित होते.

पुढे कलाकारांशी संवाद साधताना सुरेश विश्वकर्मा यांनी स्वतःची संघर्ष कहानी सांगताना सांगितले की ऊद्याची भूक भागविण्यासाठी आज पाण्यावरच समाधान मानत वडापाव साठी ५ रू. राखून ठेवत असे. कडा कारखान्यात मोलमजुरी करून लहानपणापासूनचं कलेची प्रचंड आवड जोपासणाऱ्या विश्वकर्मा यांना अनेक चित्रपटात यश मिळविले. नागराज मंजूळे यांनी फँन्ड्री मध्ये ब्रेक दिला परंतु सैराट चित्रपटातील पाटील भुमिकेने मोठी प्रसिद्धी मिळाली मग मुळशी पॕटर्न, रेगे, देऊळबंद, झुंड, हंबीरराव यासह हिंदीत कमांडो, राधे अशा अनेक चित्रपटात चांगल्या भुमिका मिळाल्या. चित्रपटातील आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल सुरेश विश्वकर्मा यांनी गाव लई जोरात मधील सर्व कलाकारांसमवेत तब्बल एक तास सुसंवाद साधला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here