जामखेड प्रतिनिधी

कोरोना महामारीतुन संरक्षण मिळावे यासाठी नगर परिषद मधील आरोग्य कर्मचारी, भाजी मंडईतील भाजी विक्रेते व चिकन विक्रेते यांना जामखेड मनसेच्या वतीने पाच हजार मास्क व गोशाळेतील गायींना हिरवा चारा वाटप करण्यात आला.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जामखेड तालुका व राहुल कंट्रक्शन यांच्यावतीने जामखेड तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते नवनाथ लांडगे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप (भाऊ) टापरे मनसे नेते पै.हवा (दादा) सरनोबत शहराध्यक्ष गणेश पवार सनी सदाफुले, पै.बापु कार्ले (सरपंच) पांडुरंग भोसले ,दादा महडिक,दादा गाडे,भरत (नाना) भोगल, भाऊ आमटे, बिभीषशन कदम, नितीन सपकाळ, भाऊ शिदें, पै.सोनू कदम, संजय सानप, भोरे,गणेश पवार, दादा कदम, संजय डोळे, पै.राहुल कदम, पै.बाला साठे, अदिभैय्या, पै.दत्ता सरनोबत, धंनजय राऊत, पै.शेखर कार्ले, दिपक मोरे, वैभव ढोले, पै.विशाल कदम, भाऊ मांडे, पै.बंडु पवार, अमोल साठे, बालाजी भोसले, उपस्थितीत होते.

कोरोनाच्या महामारी मुळे अनावश्यक खर्च टाळून राज ठाकरे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी जामखेड नगर परिषद मधील आरोग्य कर्मचारी भाजी मंडईतील भाजी विक्रेते, चिकन मार्केट येथील विक्रेते तसेच विविध कार्यक्षेत्रातील व्यक्तींना 5000 मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच साकत येथील गोशाळे मध्ये गोमाता यांना हिरवा चारा व वृक्षारोपण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here