आशीर्वाद एंटरप्राइजेस व कोठारी ज्वेलर्स यांच्या दसरा-दिवाळी खरेदी योजनेचा लकी ड्रॉ ८ नोव्हेंबरला पारदर्शकपणे होणार…

ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अव्हान

जामखेड प्रतिनिधी

शहरातील आशीर्वाद एंटरप्राइजेस व कोठारी ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दसरा-दिवाळी खरेदी योजना राबविण्यात आली होती. या योजनेस जामखेड तसेच परिसरातील ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ग्राहकांनी मोठ्या संख्येने खरेदीचा आनंद घेतला आहे.या योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन शनिवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे. हा लकी ड्रॉ आशीर्वाद एंटरप्राइजेस, मेन रोड, जामखेड येथील दुकानासमोर पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी सर्व ग्राहक, नागरिक तसेच व्यापारी वर्गाने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या खरेदी योजनेचा उद्देश स्थानिक ग्राहकांना सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्स देणे तसेच गुणवत्तापूर्ण वस्तू उपलब्ध करून देणे हा होता. योजने दरम्यान विविध स्कीम, सवलती आणि भेटवस्तूंमुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.ग्राहकांनी या उपक्रमास दिलेल्या भरघोस प्रतिसादा बद्दल आशीर्वाद एंटरप्राइजेसचे संचालक श्री. कांतीलाल कोठारी व अमोल तातेड यांनी सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. ते पुढे म्हणाले की, ग्राहकांचा विश्वास व समाधान हेच आमचे सर्वात मोठे बक्षीस असून अशा उपक्रमांमुळे व्यावसायिक व ग्राहक यांच्यातील नाते अधिक दृढ होते. दरम्यान, लकी ड्रॉमध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून यासाठी सर्व सहभागी ग्राहकांना उपस्थित राहण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here