
दिघोळ गणामध्ये सचिन (नाना) घुमरे यांचा वाढदिवस साजरा होणार सामाजिक उपक्रमातून
जामखेड प्रतिनिधी
सचिन (नाना) घुमरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन (नाना) घुमरे प्रत्येक वर्षी विविध उपक्रमाने साजरा करत असतात यावर्षी दिघोळ गणामध्ये सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येणार आहे.

विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी त्यांनी रायटिंग पॅडचे चार हजार विद्यार्थ्यांना वाटप केले होते. त्याचप्रमाणे यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सचिन (नाना) घुमरे मित्र परिवाराकडून दिघोळ गणातील माळेवाडी दिघोळ जातेगाव मोहरी व जायभायवाडी येथील सर्व शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रत्येक गावातील स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन. व्हा. चेअरमन व सर्व संचालक, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचे वाटप प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये होणार आहे.

सचिन घुमरे हे सहकारातील उभरते नेतृत्व, स्वच्छ चारित्र्य, कामात तत्पर, सभापती प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू, पक्षाध्यक्ष अंतिम मानणारे, धामणगाव व नाहुली सोसायटी वर निर्विवाद वर्चस्व असणारे सचिन घुमरे यांनी दिघोळ महिला राखीव पंचायत समिती गणासाठी पत्नी वैजयंती सचिन घुमरे यांना उभे करावे अशी मागणी गणातील अनेक गावांमधून होत आहे. तसेच दिघोळ गणातील आरक्षण सर्वसाधारण महिला असल्याने वैजयंती सचिन घुमरे यांची प्रबळ दावेदारी समजली जात आहे.
चौकट
सभापती प्रा.राम शिंदे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सचिन घुमरे यांनी दिघोळ गणात आनेक सामाजिक कामे केली आहेत. यावेळी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सचिन घुमरे मित्रपरिवाराने 1500 शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्याचा जो समाज उपक्रम राबवला आहे तो कौतुकास्पद आहे.




