

जामखेड शहरातील नागरी वस्तीस धोका उत्पन्न करणाऱ्या पिंपळाच्या झाडाच्या फांद्या उतरवल्या.
सामाजिक कार्यकर्ते शिवाजी विटकर यांचा पुढाकार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील राम मंदिरासमोरील खुपच जुने अंदाजे दिडशे वर्षापेक्षा जास्त वयाचे पिंपळाचे झाड आतून पोखरले होते. जवळून विज कनेक्शन गेलेले होते. जवळ घरे आहेत. यामुळे वारे वादळात या झाडाचा धोका निर्माण झाला होता. दिड वर्षापासून शासन पातळीवर प्रयत्न सुरू होते पण यश मिळत नव्हते.

सामाजिक कार्यकर्ते शिवाजी (गुड्डू) विटकर यांनी पुढाकार घेत परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्याच परवानगीने झाडाची विधीवत पुजा करून झाडाच्या धोकादायक झालेल्या फांद्या उतरून घेतल्या. राम मंदिरासमोर जुने जीर्ण झालेले पिंपळाचे झाड आतून पोखरले होते. त्यामुळे मंदिराला व परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला होता. जवळच विजेचे कनेक्शन आहे. जवळच अंगणवाडी आहे. त्यांमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. वादळ वारे यामध्ये कधी फांद्या पडतील हे सांगता येत नव्हते. त्यामुळे हे झाड खाली उतरवून घेतले यासाठी शिवाजी (गुड्डू) विटकर यांनी पुढाकार घेतला.

गेल्या दीड वर्षापासून नगरपरिषद यांच्या कडे पत्र व्यवहार सुरू होता पण यश मिळत नव्हते. शिवाजी (गुड्डू ) विटकर यांनी पुढाकार घेत हे झाड उतरून घेतले आहे. यामुळे राम मंदिर परिसराचा धोका टळला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते शिवाजी (गुड्डू) विटकर, अँड.रमेश काळे, रोहित रमेश काळे, पुरोहित सखाराम काळे (देवा), सीए ऋषिकेश गायकवाड, प्रमोद दळवी, ओंकार राजगुरू आदी परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना अँड रमेश काळे म्हणाले की, झाडांमुळे पर्यावरण रक्षण होते. आपण झाडांची पुजा करतोत, वृक्षवल्ली आम्हा वनचरे, झाडे सगे सोयरे आहेत. हे झाड फक्त धोकादायक भाग खाली उतरून घेतला आहे. आता परत हे झाड जोमाने फुटणार आहे. लोकांना, मंदिराला देवाला इजा होऊ नये म्हणून ते झाडाच्या फांद्या उतरून घेतल्या आहेत.







