

शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या तालुका प्रमुखपदी आलिम बशीर सय्यद तर जामखेड शहर प्रमुख पदी खंडू अडाले यांची निवड.
जिल्हाप्रमुख मनिषा पारखे व तालुका प्रमुख प्रा. कैलास माने यांनी दिले निवडीचे पत्र
जामखेड प्रतिनिधी
शिवसेना तालुकाप्रमुख प्राध्यापक कैलास माने यांच्या कार्यालय येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सौ. मनीषा पारखे जिल्हा उपप्रमुख सौ. शुभांगी काळे व तालुकाप्रमुख प्रा.कैलास माने यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना बांधकाम कामगार जामखेड तालुका प्रमुख पदी अलीम सय्यद व शिवसेना बांधकाम कामगार जामखेड शहर प्रमुख पदी खंडू आडले यांची निवड करण्यात आली. नुकतेच त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व सभापती प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड तालुक्यातील बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी नवनिर्वाचित तालुकाप्रमुख व शहर प्रमुख काम करतील. तसेच नवीन बांधकाम कामगार नोंदणीसाठी आता कामगारांना जास्त कागदपत्रे लागणार नाही कारण नविन फॉर्म अपडेट झाला आहे. तसेच नव्वद दिवस काम केलेले प्रमाणपत्र व अधारकार्ड एवढेच लागणार आहे. तसेच बाधाकाम कामगाराच्या योजनेमधुन कोणीही बंचित रहाणार नाही यासाठी लवकरच कामगारांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख प्रा. कैलास माने सर यांनी सांगितले.

यानंतर दक्षिण जिल्हाप्रमुख मनिषा पारखे यांनी बोलताना सांगितले की वंचित बांधकाम कामगार आहेत त्यांचे फॉर्म भरुन घेणे. जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ कसा मिळेल हे पहाणे. तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून शिष्यवृचे लाभ मिळवुन देणे अशी कामे करीत आहोत.

याकार्यक्रमाला उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार, सागर बाबर, जमीर पठाण, बशीर सय्यद, ज्ञानेश्वर वारे, अविनाश मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, वसीम शेख, विनोद जगताप, मिनीनाथ कोल्हे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






