एयु स्मॉल फायनान्स बँक यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप

जामखेड प्रतिनिधी

एयु स्मॉल फायनान्स बँक यांच्या वतीने जामखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेव गल्ली या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसुन येत होता.

अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त होते. अनेक गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य नसल्याने शिक्षण घेताना मोठी अडचण निर्माण होत असते याची दखल घेऊन एयु स्मॉल फायनान्स बँक यांच्या वतीने जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्याधिकारी अजय साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बँकेच्या माध्यमातून समाजासाठी काही तरी केले पाहिजे. म्हणुनच एयु स्मॉल फायनान्स बँकेने हा सामाजिक उपक्रम राबविला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडीलांची सेवा करुन ते जे सांगतील त्यांच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कष्ट व मेहनत केली तर तुम्हीदेखील माझ्यासारखे अधिकारी व्हाल असे सांगितले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता.

यावेळी जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, अर्बन बँक अहिल्यानगरचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी एम.पी. साळवे, एयु स्मॉल फायनान्स बँकेचे शाखा प्रमुख धर्मेद्र मौर्य, किरण मुठे, रुपेश शेडाळे, अक्षय गांगर्डे, नगरपरीषदेचे कर्मचारी महेश कवादे, ज्ञानेश्वर मिसाळ, हितेश वीर, महादेव गल्ली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुमन पाडळे, शिक्षक बबन गव्हाणे, संजय घोडके, शिल्पा सोरटे मॅडम, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार शिल्पा सोरटे मॅडम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here